Anganwadi Asha Sevika Allowance : कोराडी (जि. नागपूर) येथे अगरबत्ती निर्मिती केंद्राच्या भव्य शुभारंभ सोहळ्याप्रसंगी उपस्थित भगिनींसोबत संवाद साधत असताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांना प्रोत्साहन भत्ता वितरित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत तब्बल 1 कोटी 60 लाख महिलांना लाभ
मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तब्बल 1 कोटी 60 लाख महिलांना लाभ वितरित करण्यात आला असून, ही योजना यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांनाही नवरात्रीत प्रोत्साहन भत्ता वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती देत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत सहभाग घेणारा सर्व महिलांचे आभार व्यक्त केले.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधन वाढीसंदर्भात..
आशा स्वयंसेविका यांच्या वाढीव मानधनानुसार गटप्रवर्तक यांच्या मानधन वाढीचा शासन निर्णय पाहा
तारीख ठरली! लाडक्या बहिणीं’च्या खात्यात ‘या’ दिवशी जमा होणार तिसरा हप्ता
या अगरबत्ती निर्मिती केंद्राच्या स्थापनेसोबत येथे स्थानिक ७०० महिला भगिनींना रोजगार उपलब्ध होणार असुन येथे उत्पादित होणाऱ्या मालाच्या विक्रीचीही हमी देण्यात आली आहे. महिलांच्या शाश्वत विकासाचे हे उदाहरण सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनदरबारी पोहोचवून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार
महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी तयार करण्यात आलेल्या यशस्विनी प्लॅटफॉर्मवर या अगरबत्ती निर्मिती केंद्रातील उत्पादनेही विक्रीसाठी असावीत असा आग्रह यावेळी मांडला.
कंत्राटी कर्मचारी लेटेस्ट अपडेट
पिंक रिक्षा योजनेअंतर्गत नागपूर शहरात 1700 पिंक रिक्षांचे वितरण केले जाणार आहे, आमदार श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आग्रह असतो कोराडी देवस्थान येथेही विशेष बाब म्हणून महिलांना पिंक रिक्षा वितरित करण्याबाबत यावेळी सकारात्मक भूमिका मांडली असल्याची त्यांनी यावेळी माहिती दिली.
अगरबत्ती निर्मिती केंद्राच्या भव्य शुभारंभ दिनांक 16 सप्टेंबर रोजी कोराडी (जि. नागपूर) येथे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला, यावेळी आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावणकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘मुख्यमंत्री योजनादूत’ : अर्ज करण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ