दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेबाबत तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश

दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करावा, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी  दिल्या.

divyang-update


मंत्रालयात दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेसंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीला आमदार बच्चू कडू, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, या विद्यापीठाच्या माध्यमातून  दिव्यांग विद्यार्थ्यांना  उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील, आणि त्यामुळे त्यांच्या कौशल्यांचा विकास होईल, विद्यापीठाचा प्रस्ताव तयार करताना या विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाठ्यक्रमांसोबतच विशेष प्रशिक्षण कार्यक्रम, संशोधन आणि इतर उपक्रमांमध्ये अधिकाधिक सहभागी होण्याची संधी उपलब्ध होईल असा प्रस्ताव तयार करावा. प्रस्ताव तयार झाल्यानंतर मंत्रीमंडळ बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.

शिक्षण शुल्क न घेण्याबाबत वैद्यकीय महाविद्यालयांना सूचना - शासन परिपत्रक

या निर्णयामुळे दिव्यांगांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला नक्कीच गती मिळेल असेही मंत्री  श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

➡️ दिव्यांग चे  (अपंगत्वाचे) २१  प्रकार , 21 types of disability

संजय गांधी निराधार पेन्शन योजना
दिव्यांगांसाठी असणाऱ्या विविध अपंग कर्ज योजना
अपंग पेन्शन योजना | इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना

हे सुद्धा वाचा

➡️ समाज कल्याण दिव्यांग विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना

➡️ संजय गांधी निराधार पेन्शन योजना 

➡️ अपंग पेन्शन योजना | इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now