Quiz MyGov : केंद्र सरकारकडून विशेष प्रश्नमंजुषा; सहभागी होऊन डिजिटल प्रमाणपत्र मिळवा

Quiz MyGov : संयुक्त राष्ट्र संघामार्फत दिनांक 3 डिसेंबर हा दिवस जागतिक दिव्यांग दिन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. यानिमित्त शिक्षण मंत्रालयाने विशेष प्रश्नमंजुषा माध्यमातून जागतिक दिव्यांग दिन साजरा केला आहे, या प्रश्नमंजुषा स्पर्धेत तुम्ही देखील सहभागी होऊन केंद्र सरकारचे डिजिटल प्रमाणपत्र मिळवू शकता.

दिव्यांग व्यक्तींसाठी केंद्र सरकारकडून विशेष प्रश्नमंजुषा

quiz mygov

दिव्यांग व्यक्तींच्या अधिकार आणि कल्याण यासंदर्भात समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच दिव्यांग व्यक्तींना पाठबळ देण्यासाठी दरवर्षी 3 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. देशभरातील विविध राज्यांमध्ये जागतिक दिव्यांग समता सप्ताह निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करून समता सप्ताह साजरा करण्यात आला आहे.

यंदाच्या जागतिक दिव्यांग दिनाची संकल्पना ही 'दिव्यांगांसाठी त्यांच्यासह आणि त्यांच्याकडून शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि मदतीसाठी एकजुटीने कृती करणे' अशी आहे.

समाजातील सर्व क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींचे समावेशन करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना येणाऱ्या अडचणी आव्हानाबाबत जनजागृती निर्माण करणे हा या जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्याचा उद्देश आहे.

दिव्यांग व्यक्तींच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त प्रश्नमंजुषा - Quiz on International Day of Persons with Disabilities

दिव्यांग व्यक्तींच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त 3 डिसेंबर 2023 पासून प्रश्नमंजुषा https://quiz.mygov.in/ या पोर्टलवर सुरु करण्यात आली आहे. ही प्रश्नमंजुषा प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सर्वसामान्य जनतेसाठी खुली असून, तुम्ही या उपक्रमात सहभागी होऊन केंद्र सरकारचे डिजिटल प्रमाणपत्र मिळवू शकता. यासाठी 10 QUESTIONS, 300 SECONDS मध्ये सोडवायचे आहे.

सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे आणि “Quiz on International Day of Persons with Disabilities” या प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी व्हावे.

दिव्यांग व्यक्तींच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त प्रश्नमंजुषासाठी कसे सहभागी व्हावे?

  1. Quiz on International Day of Persons with Disabilities या प्रश्नमंजुषा मध्ये सहभाग घेण्यासाठी सर्वप्रथम https://quiz.mygov.in/  या वेबसाईटवर जा. (डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे)
  2. त्यानंतर START QUIZ यावर क्लिक करा. 
  3. त्यानंतर आवश्यक माहिती भरा आणि Proceed बटनावर क्लिक करा.
  4. यासाठी तुम्ही Indian नागरिक असणं आवश्यक आहे, तसेच तुमच्याकडे भारतीय मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे.
  5. या मोबाईल नंबरवर आलेला OTP टाका 
  6. आता Quiz सुरू होईल.
  7. सर्व प्रश्नांची उत्तरं देऊन झाल्यानंतर सर्टिफिकेट डाउनलोड करा.
$ads={2}

प्रश्नमंजुषा सोडवा - Quiz on International Day of Persons with Disabilities

कर्मचाऱ्यांच्या संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now