महत्वाची अपडेट! ANM/AWW/ASHA/AYUSH कर्मचाऱ्यांच्या संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित

Employees News : आरोग्य सेविका, अंगणवाडी कार्यकर्ती व आशा स्वयंसेविका यांच्या मार्फत गाव पातळीवर आरोग्य व पोषण विषयक सेवा देण्यात येतात. त्यांच्यामध्ये समन्वय रहावा व अहवालाची कार्यपध्दती एक समान रहावी या उद्देशाने ANM/AWW/ASHA/AYUSH कर्मचाऱ्यांच्या संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

$ads={1}

महत्वाची अपडेट! ANM/AWW/ASHA/AYUSH कर्मचाऱ्यांच्या संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित

employees news

मा. मुख्य सचिव महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत AAA योजनेअंतर्गत स्थानिक गाव पातळीवर आरोग्य व पोषण विषयक गृहभेटी बाबत सुधारीत सुचना निर्गमित करण्यात आल्या होत्या.

राज्यातील आदिवासी क्षेत्रातील कुपोषण कमी करण्याबाबत आढावा घेण्यासाठी व उपाययोजना सुचविण्यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रस्तुत कृती दलाच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेस अनुसरुन गाव पातळीवर आरोग्य व पोषण विषयी अधिक प्रभावीपणे काम करण्याच्या दृष्टिने आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, आयुष (समुदाय आरोग्य अधिकारी) यांनी एकत्रितपणे स्थानिक गावच्या सरपंचांच्या समन्वयाने व ग्राम पंचायतीच्या पाठबळासह काम करणे अभिप्रेत असल्याने तशा प्रकारच्या सुधारीत सुचनांचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

$ads={2}

AAA (ANM/AWW / ASHA) यांच्या कार्यप्रणालीबाबत दि.१८ जून, २०२१ च्या शासन निर्णयान्वये दिलेल्या सूचना कायम ठेवण्यात आल्या आहेत. तथापि, दरम्यानच्या कालावधीमध्ये Health and Wellness Clinic (HWC) द्वारे आरोग्य यंत्रणेमध्ये प्रवेशित झालेल्या आयुष (समुदाय आरोग्य अधिकारी) या संवर्गातील अधिकाऱ्यांमुळे गाव पातळीवर AAAA+S (ANM/AWW / ASHA / AYUSH) यांनी स्थानिक सरपंचांच्या अर्थात ग्राम पंचायतीच्या समन्वयाने काम करण्याबाबत सुधारीत सुचना देण्यात देण्यात आल्या आहेत. (शासन निर्णय)

राज्यातील या कामगारांच्या प्रश्नांबाबत हिवाळी अधिवेशनात सरकारकडून मोठा खुलासा

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now