CIDCO Recruitment 2023 : नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था 'सिडको' महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी, सिडकोतर्फ लेखा लिपिक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याचा तसेच परीक्षा शुल्क जमा करण्याचा कालावधी दि. 9 डिसेंबर 2023 ते दि. 8 जानेवारी 2024 पर्यंत आहे. या पदाचा सविस्तर तपशील पाहूया..
$ads={1}
'सिडको' महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी
लेखा लिपिक (Accounts Clerk) या संवर्गातील 23 रिक्त पदे पदासाठी जाहिरात निघाली असून यामध्ये सर्वसाधारण, महिला 30%, खेळाडू -5%, माजी सैनिक-15% , प्रकल्पग्रस्त-5%, अंशकालीन-10%, अनाथ-1%, दिव्यांग 4% याप्रमाणे आरक्षण असणार आहे. (जाहिरात PDF लिंक खाली दिलेली आहे)
वेतनश्रेणी
- एस-8, (रु. 25,500-81,100/-) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
आवश्यक वयोमर्यादा
- खुला प्रवर्ग - 40 वर्ष
- महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय प्रवर्गात मोडणा-या उमेदवारांसाठी - 45 वर्ष
- दिव्यांग - 47 वर्ष
- खेळाडू - 45 वर्ष
- माजी सैनिक - 40वर्ष सैनिकी सेवेचा कालावधी 3 वर्ष
- दिव्यांग माजी सैनिक - 47 वर्ष
- अनाथ - 45 वर्ष
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक - 45 वर्ष
लेखा लिपिक या पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता
- B.Com/ BBA/ BMS with Accountancy/ Financial Management/Cost Accounting/ Management Accounting/Auditing
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना
- इच्छुक व पात्र उमेदवारांनी लेखा लिपिक या रिक्त पदाच्या सरळसेवा भरतीसाठी https://ibpsonline ibps.in/cidcoacjun23/ या संकेतस्थळावर दि. 09.12.2023 पासून दि.08.01.2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत.
- ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या सर्व टप्यातील माहिती परिपूर्ण भरुन विहित परीक्षा शुल्क भरलेल्या परीक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दर्शविण्यात येणार आहे.
- उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्यासंबंधी अडचणी आल्यास https://curs.ibps.in/ या संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवावी किंवा दूरध्वनी क्रमांक 1800222 366/1800 103 4566 वर संपर्क साधावा.
- परीक्षेचे प्रवेश पत्र (admit card) वरील संकेतस्थळावरून स्वतः डाऊनलोड करुन घेण्याची जबाबदारी सर्वस्वी उमेदवाराची असेल, प्रवेशपत्र इतर कोणत्याही पद्धतीने पाठविले जाणार नाही.
- पात्र उमेदवारांचा अंतिम निकाल www.cidco.maharashtra.gov.in संकेतस्थळावर जाहिर करण्यात येईल.
- भरती प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत लॉग इन आयडी नंबर तसेच पासवर्ड जतन करुन ठेवावा तसेच नोंदणीकृत मोबाईल क्रमांक व ई-मेल कायम ठेवावा.
$ads={2}
इतर महत्वाच्या नोकरीच्या संधी येथे पहा
महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.
महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.