केंद्र शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांगांचा सन्मान केला आहे. दिव्यांगांच्या विकासासाठी अनेक योजना प्रभावीपणे राबवून दिव्यांगाना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्रीमती प्रतिमा भौमिक यांनी केले. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये दिव्यांगांच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली असून दिव्यांग नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.
अर्थसंकल्पामध्ये दिव्यांग विकासासाठी २७ हजार कोटी रुपयाहून ५४ हजार कोटी रुपयांची तरतूद
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले, दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासन प्रयत्न करीत आहे. अर्थसंकल्पामध्ये दिव्यांग विकासासाठी २७ हजार कोटी रुपयाहून ५४ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य संदर्भात अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. दिव्यांगाना सरकारी नोकरीमध्ये ४ टक्के आरक्षणची तरतूद केंद्र सरकारने केली आहे. यापूर्वी आरक्षण तीन टक्के होते त्यामध्ये एक टक्क्यानी वाढ केली आहे.
दिव्यांगांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत मोठे निर्णय!आपल्या शहरा सह दिव्यांगांच्या विकासासाठी महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या शिबिराचे आयोजन करण्यात येते. मनपाने पंधरा ते जिल्हा परिषदेने पाच कोटी रुपये दिव्यांग यांच्या विविध योजनांसाठी खर्च केले आहेत. यापुढे ही दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी आपल्याकडून सर्वतोपरी सहकार्य असेल, असे डॉ.कराड म्हणाले.
जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजना अत्यंत महत्वपूर्ण असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिव्यांगांच्या विकासासाठी विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे डॉ कराड यांनी सांगितले.
१४०९ दिव्यांग नागरिकांना विविध प्रकारचे साहित्य वाटप
केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून सामाजिक अधिकार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये तब्बल १४०० दिव्यांग नागरिकांना विविध प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आले. यात प्रामुख्याने तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, श्रवण यंत्र ,काठी, स्मार्ट फोन लाभार्थीना निःशुल्क देण्यात आले. दीड कोटी रुपये खर्च करून निशुल्क साहित्य वाटप करण्यात आले आहे.
दिव्यांगांसाठी घरकुल योजना; सविस्तर तपशील जाणून घ्या..
कैलास शिल्प येथे दिव्यांग सामाजिक अधिकारता शिबिराचे आयोजन येथे करण्यात आले होते. या शिबिरामध्ये तब्बल 1400 दिव्यांग नागरिकांना विविध प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रसाद रामटेके, हरीश कुमार ,डॉ. किरण पावरा, शालिनीताई बुंधे , माजी महापौर बापू घडामोडे ,धनराज मुंडे , डॉ.भगवान चव्हाण, संदीपान थोरात यांच्यासह दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते.