Contract Employees Latest News : राज्यातील विविध विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचारी तसेच करार पद्धतीने कार्यरत कंत्राटी कर्मचारी, रोजंदारी तत्वावरील कर्मचारी, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (NHM) कर्मचारी, आशा वर्कर, समग्र शिक्षा (SSA) अभियानातील कंत्राटी कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस या कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीसह दिवाळी बोनस तसेच सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे, आता नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे, सविस्तर वाचा..
$ads={1}
राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस आणि सानुग्रह अनुदान मंजूर
राज्यामध्ये विविध केंद्र तसेच राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याकरिता सरकारने कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे, एकीकडे वर्षानुवर्ष नियमित कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने अल्पमानधनावर हे कर्मचारी काम करत आहे, याबाबत शासन दरबारी वेळोवेळी सेवेत कायम करण्याबाबत या कर्मचाऱ्यांकडून मागणी करण्यात येत आहे, विविध विभगातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलना दरम्यान सरकारने सेवेत कायम करण्याचे आश्वासन दिले आहे, पण सरकार निर्णय कधी घेणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
सध्या दिवाळी सणाच्या तोंडावर सरकारने राज्यातील विविध विभागांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढीसह दिवाळी बोनस जाहीर करण्यात आले आहे.
आता नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक व अधिसंख्य पदावर कार्यरत कर्मचारी यांना ३०,००० हजार रुपये तर ठोक मानधन किमान वेतनावरील तात्पुरत्या स्वरूपात करारपध्दतीवरील वेतनश्रेणीमध्ये कार्यरत असणारे अधिकारी, कर्मचारी, रोजंदारीवरील (आरोग्य सेवक), मानधनावरील बालवाडी शिक्षक व मदतनीस यांना यांना २४,००० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
त्याचबरोबर सर्व शिक्षा अभियान (SSA), राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत शासनाने कंत्राटी तत्वावर नेमलेले व शासनाकडून मानधन प्राप्त होणाऱ्या आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ (NCH) कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांचा समावेश करून त्यांना २४,००० हजार रुपये प्रमाणे, तर आरोग्य विभागातील आशा वर्कर यांना १४,९०० हजार रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
ब्रेकिंग न्यूज! या कर्मचाऱ्यांना 26 हजार बोनस मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
राज्यातील कंत्राटी कर्मचारी शासनसेवेत नियमित आदेश पहा
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात दरवर्षी 3% वाढ मंजूर
नवी मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सन २०२२ २३ या आर्थिक वर्षाकरीता सानुग्रह अनुदान देणेबाबतच्या प्रस्तावास दिनांक ३० ऑक्टोबर २०२३ रोजी मा. प्रशासक, नवी मुंबई महानगरपालिका यांनी ठरावास मंजूरी दिलेली आहे. त्या अनुषंगाने, यावर्षी दिवाळी सण दिनांक १० नोव्हेंबर, २०२३ पासून असल्याने महानगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून सन २०२३ २४ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातील सानुग्रह अनुदान अधिकारी, कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात आले आहे. (आदेश)
मोठी बातमी! राज्यातील या कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर
राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत नोकरीची संधी!
$ads={2}
राज्यातील कंत्राटी कर्मचारी शासनसेवेत नियमित - आदेश पहा
मोठी बातमी! कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी धोरणात्मक निर्णय! महत्वाची बैठक संपन्न
महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.