आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गणित, विज्ञानात पारंगत करण्यासाठी शिक्षकांची २८२ पदे भरण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठी येणाऱ्या 30 कोटी खर्चास देखील आज मान्यता देण्यात आली.
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यासाठी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय!
इतर मागास व बहुजन कल्याण विभागामार्फत 141 कला व विज्ञान तसेच 7 कला व वाणिज्य अशी 148 उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहेत. उच्चस्तरीय सचिव समितीने गणित आणि विज्ञान विषयांकरिता पदे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार ही पदे निर्माण करण्यात येतील.
आश्रमशाळेतील विद्यार्थी 12 वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यावर वैद्यकीय, अभियांत्रिकी, स्थापत्य अशा व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. त्यांना गणित आणि विज्ञानावर आधारित नीट आणि सीईटी सारख्या परिक्षांना सामोरे जावे लागते. आर्थिक परिस्थितीमुळे खासगी ट्यूशन आणि क्लासेस न मिळाल्याने हे विद्यार्थी स्पर्धेत टिकत नाहीत त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
मंत्रिमंडळ बैठकीतील इतर निर्णय येथे पहा
महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.