NMMS Scholarship 2023: शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेसाठी ( NMMSS) शैक्षणिक प्रकल्प वर्ष 2023 24 साठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) वर नवीन व नुतणीकरण अर्जाच्या ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता पोर्टल सुरु करण्यात आले असून, ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2023 आहे.
$ads={1}
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेसाठी NSP पोर्टल सुरु
शैक्षणिक वर्ष 2023 24 करीता डी बी टी मिशन, कॅबिनेट सचिवालय यांनी शालेय शिक्षण व साक्षरता विभागाशी सदर प्रकरणी चर्चा केली व उक्त कार्यवाही करण्याकरीता कालमर्यादा ठरवून दिलेल्या आहेत, शैक्षणिक वर्ष 2023 24 साठी National Scholarship Portal साठी ठरविण्यात आलेल्या कालमर्यादा खालील प्रमाणे आहेत.
ऑनाईन अर्ज करण्यास सुरुवात - 1 ऑक्टोबर
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2023
केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार संबंधित जिल्हयांनी नवीन व नुतणीकरण अर्जाच्या ऑनलाईन नोंदणीची कामे वरील प्रमाणे निर्धारित वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे, तसेच यावर्षी कोणत्याही प्रकारे मुदतवाढ दिली जाणार नाही याबाबत कळविण्यात आले आहे.
रिलायन्स फाऊंडेशनकडून 2 लाखांची शिष्यवृत्ती अर्ज येथे करा
शैक्षणिक वर्ष 2023 24 साठी नोंदणी करतांना वय वर्ष १८ पूर्ण असणे आवश्यक असून, त्याचे आधार कार्ड असणेही अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अदयापही Aadhaar card काढलेले नाही, त्या विद्यार्थ्यांनी आधारकार्ड साठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे, तसेच त्यांनतर नावनोंदणी ( eKYC) वापरून पोर्टलला नोंदणी करणे आवश्यक आहे. सदर आधार बाबत संपूर्ण तपशिल सबमिट होईपर्यंत आणि ई के वाय सी होईपर्यंत सदर विद्यार्थ्यांची नोंदणी तात्पुरती असेल. शिष्यवृत्ती पात्र अपात्र या बाबीसाठी आधार महत्वाचे असणार आहे.
राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल काय आहे? सविस्तर Video पहा
$ads={2}
राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल - https://scholarships.gov.in/
कर्मचारी अपडेट्स - कंत्राटी कर्मचारी लेटेस्ट न्यूज - सरकारी कर्मचारी
महाज्योती टॅबची दुसरी यादी जाहीर, यादी येथे डाउनलोड करा