Gram Panchayats Election 2023: राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्य पदाच्या; तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. सविस्तर जाणून घ्या.
$ads={1}
राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान
राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 ऑक्टोबर 2023 रोजी होईल.
नामनिर्देशनपत्रे 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. 5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल.
मतमोजणी 6 नोव्हेंबर 2023 रोजी होईल. मात्र, गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे 7 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होईल.
$ads={2}
इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी!EPFO चे नवीन अपडेट जाणून नक्कीच आनंदी व्हाल! वाचा संपूर्ण माहिती;
जिल्हा परिषद भरती परीक्षा Hall Ticket डाउनलोड डायरेक्ट लिंक
तलाठी भरती परीक्षा निकाल कट ऑफ जिल्हानिहाय डायरेक्ट लिंक