LPG Gas New Price In Maharashtra: केंद्र सरकारने LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीबाबत आणखी एक मोठी घोषणा केली आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणखी एक भेट देताना मंत्रिमंडळाने एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी 100 रुपयांनी वाढवली आहे. या पूर्वीच्या 200 रुपयांच्या अतिरिक्त सबसिडीऐवजी आता 300 रुपयांची सबसिडी मिळणार असून, एलपीजी सिलेंडरची किंमत आता लाभार्थ्यांसाठी 600 रुपये असणार आहे. नवीन LPG सिलिंडर चे महाराष्ट्रातील दर सविस्तर पाहूया..
$ads={1}
LPG सिलिंडरवर 300 रुपयांची सबसिडी मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; नवीन दर येथे पहा
मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PM Ujjwala Yojna) लाभार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कम वाढवण्याची घोषणा केली. मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली.
उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नवीन दर हे मुंबई 602.50 रुपये, कोलकत्ता 629 रुपये, दिल्ली 603 रुपये आणि चेन्नई 618.50 रुपये असणार आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी सुधारित जिल्हानिहाय दर खाली दिलेले आहेत.
The government has raised subsidy amount for Pradhan Mantri Ujjwala Yojana beneficiaries from Rs 200 to Rs 300 per LPG cylinder: Union minister Anurag Thakur during a briefing on Cabinet decisions pic.twitter.com/Dvf7wXtXQT
— ANI (@ANI) October 4, 2023
सामान्य नागरिकांसाठी सिलिंडरचे नवीन दर | LPG Gas Price In Maharashtra
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना LPG Cylinder वरील पूर्वीच्या सवलतीचा लाभ तर मिळालाच, पण सर्वसामान्य नागरिकांसाठी एलपीजी सिलिंडरची किंमत 200 रुपयांनी कमी झाली. यानंतर दिल्लीत सर्वसामान्य नागरिकांसाठी 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 1103 रुपयांवरून 903 रुपयांवर आली आहे. देशातील मोठ्या शहरांबद्दल बोलायचे झाले तर मुंबईत 902.50 रुपये, चेन्नईमध्ये 918 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, कानपूरमध्ये 918 रुपये, प्रयागराजमध्ये 956 रुपये, भोपाळमध्ये 908.50 रुपये, जयपूरमध्ये 906.50 रुपये, पटनामध्ये 1001 रुपये आहेत. रायपूरमध्ये एक सिलिंडर 974 रुपयांना मिळतो.
महाराष्ट्र LPG घरगुती गॅस किंमत
- अहमदनगर - 916.50
- अकोला - 923
- अमरावती - 936.50
- छत्रपती संभाजीनगर - 911.50
- भंडारा - 963
- बीड - 928.50
- बुलढाणा - 917.50
- चंद्रपूर - 951.50
- धुळे - 923
- गडचिरोली - 972
- गोंदिया - 971
- मुंबई - 902.50
- हिंगोली - 928.50
- जळगाव - 908.50
- जालना - 911.50
- कोल्हापूर - 905.50
- लातूर - 927.50
- मुंबई शहर - 902.50
- नागपूर - 954.50
- नांदेड - 928.50
- नंदुरबार - 915.50
- नाशिक - 906.50
- धाराशिव - 927.50
- पालघर - 914.50
- सांगली - 905.50
- ठाणे - 902.50
- परभणी - 929
- पुणे - 906
- रायगड - 913.50
- रत्नागिरी - 917.50
- सातारा - 907.50
- सिंधुदुर्ग - 917
- सोलापूर - 918
- वर्धा - 963
- वाशिम - 923
- यवतमाळ - 944.50
म्युचल फंड की फिक्सड डिपॉझिट? कुठे मिळतो जास्त परतावा? पहा
उज्ज्वला लाभार्थ्यांची संख्या 9.60 कोटी
उज्ज्वला लाभार्थ्यांची किंमत गेल्या महिन्यात सप्टेंबर 2023 मध्ये केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी सिलिंडरवर दिलेली सबसिडी 200 रुपयांवरून 400 रुपयांपर्यंत वाढवल्यानंतर दिल्लीत 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1103 होती. परंतु उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी ती 703 रुपये होती. आता 200 रुपयांऐवजी 300 रुपयांची सूट देण्यात आली आहे, त्यामुळे अनुदानित सिलिंडरची किंमत 603 रुपयांवर आली आहे.
कर्मचारी अपडेट्स - कंत्राटी कर्मचारी - सरकारी कर्मचारी
सामान्य नागरिकांसाठी दिल्लीत सिलिंडरची किंमत 903 रुपये आहे. उज्ज्वला लाभार्थ्यांची संख्या 9.60 कोटी आहे. PM Ujjwala Yojna 1 मे 2016 रोजी सुरू झाली आणि योजनेंतर्गत, प्रथमच लाभार्थ्यांना गॅस सिलिंडर आणि गॅस स्टोव्ह मोफत देण्यात आला आहे. सध्या त्याच्या लाभार्थ्यांची संख्या 9.60 कोटी आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने एलपीजी सिलिंडरवरील अनुदानात वाढ करण्याच्या घोषणेसोबतच केंद्र सरकारने आणखी 75 लाख लाभार्थी जोडण्यास मान्यता दिली होती, या वाढीनंतर देशातील उज्ज्वला लाभार्थ्यांची संख्या 10 कोटी 35 लाख होणार आहे.