Lek Ladki Yojana 2024 : राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय नुकताच सरकारने घेतला आहे. या योजनेमध्ये मुलीस १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे. लेक लाडकी योजनेची संपूर्ण माहिती सविस्तर पाहूया..
मुलींना लखपती करणारी लेक लाडकी योजना राज्यात लागू
माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) ही योजना अधिक्रमित करून राज्यात दिनांक १ एप्रिल, २०२३ पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी 'लेक लाडकी' योजना सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
लेक लाडकी योजनेत किती लाभ मिळणार?
सदर योजने अंतर्गत खालील आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, सहावीत ७ हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये याप्रमाणे एकूण रुपये १ लाख १ हजार रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे.
लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- लाभार्थीचा जन्माचा दाखला
- कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १ लाखपेक्षा जास्त नसावे.) याबाबत तहसिलदार / सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील.
- लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथील राहील)
- पालकाचे आधार कार्ड
- बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
- रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत)
- मतदान ओळखपत्र
- शाळेचा दाखला (Bonafied)
- स्वयं घोषणापत्र
लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कोठे करावा?
लेक लाडकी योजनेसाठी मुलीच्या पालकांनी १ एप्रिल २०२३ रोजी वा तदनंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर, त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टामध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक त्या कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.