Walk In Interview: आरोग्य विभागात रिक्त पदांसाठी थेट मुलाखत! तब्बल 90000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी

Health Department Walk In Interview: राज्यातील जालना जिल्हातील शासकीय आरोग्य संस्थामध्ये रिक्त असलेल्या महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवागट-अ (वर्ग-२) संवर्गातील तदर्थ वैद्यकिय अधिकारी गट-अ यांची जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जालना यांचे अधिनस्त असलेल्या संस्थेतील रिक्त पदे भरण्यासाठी थेट मुलाखत (Walk in Interview) १२ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे, या पदासाठी तब्बल 75 हजार ते 90000 रुपयांपर्यंत पगाराच्या नोकरीची संधी आहे.

$ads={1}

आरोग्य विभागात रिक्त पदांसाठी थेट मुलाखत!

Health Department Walk In Interview

जालना जिल्हातील शासकीय आरोग्य संस्थामधील १६ रिक्त पदे व जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय जालना यांचे अधिनस्त संस्थेतील ४ पदे असे एकूण २० पदे निव्वळ कंत्राटी पध्दतीने व तात्पुरत्या स्वरुपात अकरा महिन्याच्या कालावधीकरीता भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली आहे.

इच्छुक सर्व MBBS & Post Graduate / Graduate (Specialist) अर्हता प्राप्त उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दिनांक १२ ऑक्टोबर २०२३ रोजी सर्व विषयांचे गुणपत्रक, पदवी / पदवीका प्रमाणपत्र, वयाचा दाखला, अनुभव प्रमाण पत्र, महाराष्ट्र मेडीकल कौन्सील नोंदणी प्रमाणपत्र आणि अलीकडील पासपोर्ट साईजचे दोन फोटो व इतर | आवश्यक सर्व मुळ कागदपत्रासह व अर्जासोबत साक्षाकिंत छायाकिंत प्रतीच्या एका संचासह सकाळी ११.०० ते १२.०० वाजेपर्यंत नोंदणी व अर्जाची छाननी करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे उपस्थित रहावे, त्यानतंर सकाळी १२.०० पासून छाननी केलेल्या अर्जामधील पात्र उमेदवारांची प्रत्यक्ष थेट मुलाखत (Walk- in-Interview ) घेण्यात येणार आहे. उमेदवारांचे वय ५८ वर्षापेक्षा जास्त नसावे.

तब्बल 90000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी

आदिवासी व दुर्गम भागात काम करणारे एम.बी.बी.एस. अर्हताधारकाना दरमहा रु.८०,०००व इतर भागासाठी त्यांना मासिक रु. ७५,००० हजार व पदयुत्तर / पदवीका अर्हताधारक यांना अदिवासी व दुर्गम भागात काम अर्हता धारकांना दरमहा रुपये ९०,०००/- व इतर भागासाठी दरमहा रुपये ८५,००० हजार इतकी एकत्रीक ठोक रक्कम अदा करण्यात येणार आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! सेवेत नियमित आदेश जारी

Health Department Walk In Interview

सदर निवड प्रक्रियामध्ये पदे ऐनवेळी कमी व जास्त करण्यांचे तसेच निवड प्रक्रीया राबविण्याच्या पध्दतीचे पूर्ण अधिकार निवड समितीचे राहतील व या बाबत कसलीही. तक्रार करता येणार नाही.

सदर जाहिरात www.jalna.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली असून, मुलाखतीस अर्ज करण्यासाठी अर्ज नमुना उपलब्ध असेल.

$ads={2}

कर्मचारी अपडेट्स कंत्राटी कर्मचारी लेटेस्ट न्यूज - सरकारी कर्मचारी

रिलायन्स फाऊंडेशनकडून 2 लाखांची शिष्यवृत्ती अर्ज येथे करा
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now