Bank Fixed Deposit Interest Rate: FD मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी हे वाचा! कोणती बँक देते सर्वाधिक व्याजदर? जाणून घ्या!

Bank Fixed Deposit Interest Rate: गुंतवणूक करत असताना कित्येक नागरिकांना हाच प्रश्न येतो की, कोणत्या बँकेमध्ये गुंतवणूक (Invest) केल्यास आपल्याला जास्त परतावा मिळेल? तसेच कोणती बँक गुंतवणुकीवर विविध सुविधा पुरवत आहे? आपला जास्तीत जास्त फायदा करून देणारी बँक कोणती आहे? असे विविध प्रश्न नागरिकांना येतात. अशावेळी काही तज्ञांचा आढावा घेऊन गुंतवणूक केले तर नक्कीच गुंतवणूकदार फायद्यामध्ये राहू शकतात, गुंतवणूक करण्याआधी सर्वात प्रथम Bank Fixed Deposit Interest Rate कोणती बँक सर्वाधिक व्याजदर देते? तसेच कोणत्या बँकेच्या माध्यमातून विविध सुविधा पुरवल्या जातात? ज्या आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. अशा विविध बाबींची माहिती घेणे गरजेचे असते. तर चला याच प्रश्नांची उत्तरे आज आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून बघूया. कृपया लेख शेवटपर्यंत वाचा.

$ads={1}

FD मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी हे वाचा! कोणती बँक देते सर्वाधिक व्याजदर? जाणून घ्या!

Bank Fixed Deposit Interest Rate

Bank Fixed Deposit Interest Rate : तसे अलीकडे बघितले तर सर्वच बँकांनी त्यांच्या व्याजदरामध्ये चांगली सुधारणा केली आहे. परंतु यामधूनही नक्की कोणती बँक चांगला व्याजदर देत आहे? हा प्रश्न निर्माण होतोच. तर चला जाणून घेऊया विविध बँकांनुसार त्यांच्या एफडीवरील व्याजदर. गुंतवणूक करण्यासाठी कित्येक बँक आहेत. परंतु आपण यामधील कोणती बँक निवडावी? असा प्रश्न आपल्याला उपस्थित होतो अशावेळी आपल्याला त्या बँकेच्या व्याजदरा विषयी व इतर बाबींविषयी विषयी सविस्तर माहिती असणे गरजेचे आहे. (Fixed Deposit Rates) मग ती एखादी पतसंस्था असो किंवा एखादी खाजगी तसेच सहकारी बँक असो.

बँक मुदत ठेव व्याज दर | Bank Fixed Deposit Interest Rate

Yes bank FD Interest Rates

सर्वसामान्य नागरिकांसाठी Yes bank एफडीवर 3.25% ते 7.50% इतका व्याजदर देत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी यामध्ये थोडीशी वाढ केली असून 3.75% ते 8.25% इतके व्याजदर या बँकेच्या माध्यमातून मिळत आहे.

Union bank FD Interest Rates

सर्वसाधारणपणे युनियन बँकेमध्ये सामान्य खातेदार नागरिकांसाठी एफडीच्या गुंतवणुकीवर 3% ते 7% इतके व्याजदर मिळत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांकरिता 3.50% ते 7.50% इतके व्याजदर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक देत आहे.

Canara Bank FD Interest Rates

Canara Bank मध्ये गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना एफडीवर एकूण 4% ते 7.25% इतके व्याज मिळत आहे. तसेच हे प्रमाण ज्येष्ठ नागरिकांकरिता 7.75% इतके निश्चित केले आहे.

Axis Bank FD Interest Rates

इतर बँका प्रमाणे ॲक्सिस बँकेत सुद्धा 03% पासून 7.10% पर्यंत व्याज या ठिकाणी दिले जात आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांकरिता 3 टाक्यांपासून 8 टक्क्यांपर्यंत व्याजदर दिला जात आहे.

Punjab National Bank FD Interest Rates

सर्वात मोठ्या सार्वजनिक बँकांपैकी एक बँक म्हणजे Punjab National Bank ही बँक सुद्धा एफडी मधील गुंतवणुकीवर 3.5% पासून 7.25% इतके व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी चार टक्क्यांपासून आठ टक्क्यांपर्यंत व्याजदर बँक देत आहे.

ICICI Bank FD Interest Rates

ICICI Bank FD मधील गुंतवणुकीवर तीन टक्क्यांपासून सात टक्के इतके व्याज देत आहे. अशावेळी ज्येष्ठ नागरिकांकरिता 3.50% टक्क्यांपासून 7.75 टक्के इतके व्याजदर या ठिकाणी दिले जात आहे.

HDFC Bank FD Interest Rates

अनेकांच्या पगाराच्या खात्यांचा हिशोब ठेवणारी HDFC Bank या बँकेवर सर्वसाधारणपणे 3.5% पासून 7.25 टक्के इतके व्याज सर्वसामान्य नागरिकांसाठी दिले जात असून, ज्येष्ठ नागरिकांकरिता 3.50 टक्क्यांपासून 7.75 टक्के इतके व्याजदर या ठिकाणी दिले जात आहे.

$ads={2}

State Bank of India FD Interest Rates

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही देशभरातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर एफडीवर तीन टक्क्यांपासून सात टक्के इतके व्याज दिले जात आहे. तर अशावेळी जेष्ठ नागरिकांसाठी 3.50% पासून 7.60% इतके व्याजदर या ठिकाणी दिले जात आहे.

म्युचल फंड की फिक्सड डिपॉझिट? कुठे मिळतो जास्त परतावा? पहा

नोट -  गुंतवणूक करण्याआधी नोंदणीकृत वित्त सल्लागाराची मदत घ्यावी. तसेच बँकेत संपर्क साधावा.

Disclaimer

या लेखाच्या मजकुरात कोणताही आर्थिक किंवा व्यावसायिक सल्ला दिलेला नाही. मात्र आपणास आर्थिक घडामोडींशी संबंधित शैक्षणिक मार्गदर्शन करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. आर्थिक किंवा व्यवसायिक विषयांशी संबंधित सल्ला हवा असल्यास आपण नोंदणीकृत वित्त सल्लागाराची मदत घ्यावी. धन्यवाद!

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now