Teacher News : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना लागू करण्यात आलेल्या त्रिस्तरीय वेतनश्रेणीच्या अनुषंगाने प्रशिक्षण पुर्ण करण्याच्या वरिष्ठ व निवड श्रेणीस पात्र शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षणातून सवलत देण्याबाबत महत्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
$ads={1}
सरकारचा शिक्षकांना मोठा दिलासा! सेवानिवृत्त शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षणातून सवलत
दि. २० जुलै, २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांमधील व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना लागू करण्यात आलेल्या त्रिस्तरीय वेतनश्रेणीच्या अनुषंगाने दयावयाच्या प्रशिक्षणामध्ये अंशत: बदल करुन तीन आठवडयाच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाऐवजी १० दिवसांचे अथवा घडयाळी ५० तासांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
सदर शासन निर्णयान्वये प्रशिक्षण सुरु होण्याचा कालावधी अंदाजित करुन दिनांक ३१/१०/२०२१ पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या अथवा त्यापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ व निवड श्रेणीस पात्र शिक्षकांना प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीमधून सवलत देण्यात आली होती. दिनांक २२ ऑक्टोंबर २०२१ शासन निर्णयान्वये शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांना तसेच मुख्याध्यापकांना लागू करण्यात आला आहे.
तथापि, प्रशिक्षण कार्यक्रमाचे विकसनानंतर प्रत्यक्षात दि. १ जून २०२२ पासून प्रशिक्षण सुरु करण्यात आल्याने तसेच प्रशिक्षण सुरु झाल्यानंतर, प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळण्यासाठी ४५ दिवसांचा अवधी देण्यात आल्याने वरिष्ठ व निवड श्रेणीस पात्र दि. ३१/०५/२०२२ अखेर सेवानिवृत्त तसेच काही प्रकरणी दि. ३१/०७/२०२२ अखेर सेवानिवृत्त शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे अशा वरिष्ठ व निवड श्रेणीस पात्र शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षणातून सवलत देण्याबाबत महत्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांमधील व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना लागू करण्यात आलेल्या त्रिस्तरीय वेतनश्रेणीच्या अनुषंगाने दयावयाच्या प्रशिक्षणाबाबत निर्गमित शासन निर्णय दि. २०/०७/२०२१ नुसार प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीमधून सवलत देण्याबाबतची मुदत शासन स्तरावरुन प्रशिक्षणाचे आयोजन न झाल्याने/ प्रशिक्षणाची संधी उपलब्ध न झाल्याने वाढविण्यात येत असून, दि. ३१ जुलै, २०२२ पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ व निवड श्रेणीस पात्र शिक्षकांना/मुख्याध्यापकांना प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीमधून सवलत देण्यात आली आहे. [शासन निर्णय]
$ads={2}