SBI PO Recruitment 2023: देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसर (SBI PO 2023) पदांच्या तब्बल 2000 रिक्त जागा भरण्यासाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. Probationary Officer पदांसाठी Registration सुरु झाले असून, अर्ज करण्यासाठी आता मुदतवाढ मिळाली असून, दिनांक 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे, तेव्हा या संधीचा लाभ घेण्यासाठी सविस्तर वाचा...
$ads={1}
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 2000 पदासाठी भरती सुरू
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया 7 सप्टेंबर 2023 पासून सुरू झाली असून, उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने 27 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र आता नोंदणीसाठी मुदतवाढ मिळाली असून, 3 ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरता येणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोबेशनरी ऑफिसर (SBI PO Exam 2023) पदाची पूर्व परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. पदांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
शैक्षणिक पात्रता : या पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधर किंवा त्यास समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. मात्र मुलाखतीच्या वेळेस त्यांना सदर कागदपत्रे सादर करावी लागेल. तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट इत्यादी पात्रता असलेले उमेदवारही या पदांसाठी पात्र आहेत.
परीक्षा फी : OPEN, EWS आणि OBC उमेदवारांसाठी 750 रुपये तर SC, ST आणि PWBD उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
जिल्हा परिषद भरती परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर!
SBI PO पदासाठी असे करा रजिस्ट्रेशन - डायरेक्ट लिंक
जाहिरात डाउनलोड करा
SBI PO पदासाठी ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
$ads={2}
मुंबई हाय कोर्टात नवीन पदांची भरती
या विभागात 2 हजारांहून अधिक पदांची भरती जाहिरात
मोठी अपडेट! ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल जाहीर