SBI FD Scheme : गुंतवणूकदारांसाठी एक चांगली संधी आहे, देशातील सर्वात मोठी लोकप्रिय सरकारी बँक म्हणजे State Bank of India आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच चांगल्या परतावा देणाऱ्या योजना आणत असते, SBI मध्ये सध्या एक विशेष मुदत ठेव योजना म्हणजे SBI Amrit Kalash FD योजना खूप लोकप्रिय होत असून, SBI ने या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी तिसऱ्यांदा मुदत वाढवून दिली आहे. विशेष म्हणजे ही FD योजना कमी कालावधीत चांगले व्याज आणि कर्ज सुविधा देखील देते, अमृत कलश योजना काय आहे? सविस्तर पाहूया..
$ads={1}
स्टेट बँक ऑफ इंडिया 400 दिवसांची अप्रतिम FD योजना
विशेष मुदत ठेव (Fixed Deposit) योजना म्हणजेच FD हा गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय मानला जातो. गेल्या वर्षी जेव्हा महागाईचा दर वाढला होता तेव्हा भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली होती. देशातील अनेक बँकांनी त्यांच्या FD वरील व्याजदरात वाढ करून ग्राहकांना दिलासा दिला होता. ही योजना अजूनही सुरू आहे आणि बँका विशेष मुदत ठेव FD वर चांगले व्याज देत आहेत. यामध्ये देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे SBI या बँकेची अमृत कलश योजना (SBI Amrit Kalash FD) यामध्ये समाविष्ट आहे, ज्यामध्ये 7.10% व्याज दिले जात आहे. SBI Amrit Kalash FD योजनेची मुदत 15 ऑगस्ट 2023 रोजी संपणार होती, परंतु SBI ने ही मुदत पुन्हा वाढवली आहे.
म्युचल फंड की फिक्सड डिपॉझिट? कुठे मिळतो जास्त परतावा? पहा
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार, ग्राहकांना विशेष मुदत ठेव योजना अमृत कलश एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची अजून एक संधी मिळाली आहे. या योजनेची वाढती लोकप्रियता पाहून बँकेने या FD योजनेची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. आता गुंतवणूकदार 31 डिसेंबर 2023 पर्यंत खाते उघडता येईल आणि या मुदत ठेव योजनेचा लाभ घेता येऊ शकेल. ही SBI ची विशेष FD योजना आहे, ज्यामध्ये 400 दिवसांची गुंतवणूक करावी लागते.
स्टेट बँक ऑफ इंडिया अमृत कलश विशेष मुदत ठेव योजना
- SBI Amrit kalash विशेष FD योजनेमध्ये 2 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.
- विशेष मुदत ठेव योजना 400 दिवसांच्या कालावधीसाठी आहे.
- सामान्य गुंतवणूकदारांसाठी व्याज दर 7.10 टक्के आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के मिळते.
- अमृत कलश योजनेवरील व्याजाची गणना मासिक, त्रैमासिक आणि अर्धवार्षिक आधारावर केली जाते. विशेष मुदत ठेवींसाठी, व्याज मुदत पूर्तीवर दिले जाते.
- FD स्कीमवरील टीडीएस आयकर कायद्यानुसार कापला जातो.
- इन्कम टॅक्स नियमांतर्गत कर कपातीतून सूट मिळते. यासाठी फॉर्म नंबर 15G/15H भरावा लागतो.
- SBI अमृत कलश योजनेवर कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय मुदतपूर्व पैसे काढण्याची देखील सुविधाही उपलब्ध आहे.
- SBI च्या स्थानिक शाखेला भेट देऊन, नेटबँकिंगद्वारे किंवा SBI YONO मोबाइल App वापरून अमृत कलश योजनेत गुंतवणूक करता येते.
SBI च्या या विशेष FD योजनेत सर्वसामान्य ग्राहकांना 7.1% दराने व्याज मिळत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना 7.6% टक्के दराने व्याज दिले जाते. बँकेने या वर्षी 12 एप्रिल रोजी ही योजना सुरू केली होती आणि तिची अंतिम मुदत 23 जून 2023 निश्चित करण्यात आली होती. परंतु, शेवटची तारीख संपण्यापूर्वीच बँकेने ग्राहकांना SBI Amrit Kalash FD योजनेत गुंतवणूक करण्यासाठी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत संधी दिली. आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली असून 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.
$ads={2}
अमृत कलश एफडी योजनेंतर्गत खातेधारक त्यांचे व्याज मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक आणि पूर्ण वर्षाच्या आधारावर घेऊ शकतात. TDS मधून कापलेले व्याज ग्राहकाच्या खात्यात जमा केले जाते. प्राप्तिकर (IT) नियमांनुसार फॉर्म 15G कर कपात सूट मिळण्यासाठी विनंती करू शकतात.
खाते उघडण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, ओळखीचा पुरावा, वयाचा ओळखीचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा, चालू मोबाइल क्रमांक, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि ई-मेल आयडी आवश्यक आहे. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्ही SBI शाखेत जाऊन खाते उघडू शकता. शाखेत तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. यानंतर, मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून तुम्हाला SBI Amrit kalash FD Scheme चा लाभ घेता येईल.
मोठी अपडेट ! तलाठी भरती परीक्षेच्या तारखेबाबत जाहीर सूचना! सविस्तर वाचा
हे ही वाचा - बाह्यस्रोत यंत्रणा कर्मचाऱ्यांना मासिक पगार इतका मिळणार - सरकारी विमा योजना जाणून घ्या