Old Pension Scheme: राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी, कुटुंब निवृत्ती वेतन, मृत्यू उपदान, रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यासंदर्भात दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने DCPS आणि NPS योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे, सविस्तर पाहूया..
$ads={1}
सरकारी कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्तीवेतन उपदान लागू
वित्त विभागाने निर्गमित केलेल्या 31 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना (DCPS) आणि राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली (NPS) लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना पुढील लाभ लागू करण्यात आले आहेत. [Family Pension Gratuity]
- कर्मचाऱ्यांचा शासकीय सेवाकालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला, कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान लागू करण्यात आले आहे.
- तसेच रुग्णता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान
- व सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ति उपदान अनुज्ञेय करण्यात आले आहे.
कुटुंब निवृत्तीवेतन आता 'या' कर्मचाऱ्यांना लागू
वरील सेवेचा लाभ हा आता राज्यातील अकृषि विद्यापीठे व संलग्नित मान्यता प्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालये, तंत्रशास्त्र, अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, वास्तुशास्त्र महाविद्यालये, तंत्रनिकेतने, तंत्र शिक्षण संचालनालय, कला संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या अशासकीय अनुदानित संस्था, शासन अनुदानित अभिमत विद्यापीठे यामधील शासन अनुदानित पदावर नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना (DCPS) आणि राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली (NPS) लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना खालील लाभ लागू करण्यात आले आहेत.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या 25 मे 2023 च्या शासन निर्णयानुसार खालील निर्णय लागू करण्यात आले आहे. Family Pension Gratuity GR
- सेवेत असतांना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंबनिवृत्ति वेतन आणि मृत्यू उपदान लागू
- रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ति उपदान लागू करण्यात येत आहे.
- तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ति उपदान लागू करण्यात येत आहे.
अटी व शर्ती सविस्तर पाहण्यासाठी 25 मे 2023 रोजीचा शासन निर्णय अवश्य पहावा डाउनलोड करा
आता उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दिनांक २५ मे, २०२३ च्या शासन निर्णयान्वये परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान, रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच, सेवेतून निवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाचा लाभ अनुज्ञेय करण्यात आला आहे. या अनुषंगाने कार्यपध्दती बाबतच्या सविस्तर सूचना दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आल्या आहेत. {सविस्तर शासन निर्णय पहा}
EPFO चे नवीन अपडेट जाणून नक्कीच आनंदी व्हाल! वाचा संपूर्ण माहिती;$ads={2}
मोठी अपडेट! जिल्हा परिषद भरती परीक्षा वेळापत्रक जाहीर, जिल्हानिहाय वेळापत्रक
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या न्यायिक मागण्यासाठी बेमुदत आंदोलन