NMMS Scholarship Exam Date 2023 : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) ही परीक्षा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात येणार होती, मात्र काही प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे.
एनएमएमएस परीक्षेची तारीख बदलली; नवीन तारीख जाणून घ्या!
एनएमएमएस शिष्यवृत्तीस पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यास दरमहा 1000 रुपये प्रमाणे, वार्षिक 12000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. शैक्षणिक वर्ष २०२३ २४ साठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी NMMS शिष्यवृत्ती योजना परीक्षा इ. ८ वी साठी दि. १७ डिसेंबर, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार होती. मात्र काही प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा दि. १७ डिसेंबर, २०२३ ऐवजी दि. २४ डिसेंबर, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार आहे.
एनएमएमएस (NMMS) शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना किती शिष्यवृत्ती मिळते?
कर्मचारी अपडेट - कंत्राटी कर्मचारी बातम्या - सरकारी कर्मचारी बातम्या
गुड न्यूज! राज्यातील शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर
एनएमएमएस (NMMS) परीक्षेसाठी आवश्यक पात्रता
- महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता 8 वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणारे नियमित मुला/मुलीना या परीक्षेस बसता येते.
- पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे.
- नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापनाप्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा / तलाठयांचा सन २०२२-२३ च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा.
- सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवावा.
- विद्यार्थी/विद्यार्थ्यांनी इ.7 वी मध्ये किमान 55% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.
- (अनुसूचीत जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) चा विद्यार्थी किमान 50% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यासाठी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय!
एनएमएमएस (NMMS) परीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम
उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.
- सामान्य विज्ञान 35 गुण, भौतिकशास्त्र 11 गुण, रसानशास्त्र 11 गुण, जीवशास्त्र 13 गुण,
- समानशास्त्र 35 गुण, इतिहास 15 गुण, नागरिकशास्त्र 05 गुण, भूगोल 15 गुण
- गणित 20 गुण
माध्यम - परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराची, इंग्रजी, तेलुगू व कन्नड या सात माध्यमातून घेतली जाते.
महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.