New Education Policy : नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पूर्वीच्या 10+2+3 या रचनेमध्ये बदल करून 5+3+3+4 याप्रमाणे रचनात्मक बदल केला आहे. यामध्ये पायाभूत स्तरापासून पदवी स्तरांपर्यच्या शिक्षणाचा समावेश केला आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये National Education Policy 2020 ची प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वय यंत्रणा (Nodal Agency) म्हणून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग कार्यरत आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, सविस्तर पाहूया..
$ads={1}
महाराष्ट्रात 11 सदस्यीय सुकाणू समितीची स्थापना
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या 29 जुलै 2020 रोजीच्या बैठकीमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे मुख्यतः 5 स्तंभावर आधारीत आहे.
- Access. (सर्वाना सहज शिक्षण)
- Equity (समानता)
- Quality (गुणवत्ता)
- Affordability (परवडणारे शिक्षण)
- Accountability(उत्तर दायित्व)
नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पूर्वीच्या 10+2+3 या रचनेमध्ये बदल करून 5+3+3+4 याप्रमाणे रचनात्मक बदल केला आहे. यामध्ये पायाभूत स्तरापासून पदवी स्तरांपर्यच्या शिक्षणाचा समावेश केला आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये NEP, २०२० ची प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वय यंत्रणा (Nodal Agency) म्हणून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग कार्यरत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती गठीत करण्यात आली आहे.
मा.मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यीय राज्यस्तरीय सुकाणू समिती गठीत करण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची शासन स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सदर समितीची राहणार आहे. National Education Policy 2020 नुसार शासन स्तरावरून नियुक्त करण्यात आलेल्या अन्य समित्यांचा अहवाल सदर समितीने वेळोवेळी मागवून व आवश्यक ते निर्देश सदर समिती देणार आहे.
सदर कामकाज कालमर्यादित असल्याने निश्चित करण्यात आलेल्या 297 कार्याचे (Task) चे प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सर्व संबंधितांना सदर समिती निर्देश देईल, याबाबतचा शासन निर्णय 5 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी सविस्तर जाणून घ्या
मोठी बातमी! गणेशोत्सवाची कर्मचाऱ्यांना मोठी भेट