CMMRF Online Registration : सरकारचा मोठा दिलासा, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी आता घरबसल्या ऑनलाईन अर्ज करा!

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत अवघ्या 14 महिन्यात 13 हजाराहून अधिक गोरगरीब - गरजू रुग्णांना एकूण 112 कोटी 12 लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे. आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी सोपे झाले असून, यासाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही. CMMRF या अँप्लिकेशनवर अर्ज भरुन मदत मिळविता येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली आहे. Mukhyamantri Sahayata Nidhi Online Registration कोठे आणि कसे करावे? सविस्तर जाणून घ्या..

$ads={1}

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी आता घरबसल्या ऑनलाईन अर्ज करा!

Mukhyamantri Sahayata Nidhi Online Registration

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशीलतेमुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अनेक-विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला आहे. यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे. 

These include Angioplasty, Bypass Surgery, Cancer Surgery, Chemotherapy, Dialysis, Cochlear Implant Surgery which is essential for congenitally deaf and dumb children, All types of Organ Transplantation Surgery, Road Accidents, Electrical Accidents, Burn Patients, Cardiac Surgery of Congenital Children etc.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश मिळविले आहे. यामुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळाले आहे. गोरगरीब गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून अर्थसहाय्य केले जाते. 

या निधीचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी https://play.google.com/store/apps/details?id=com.etech.cmrelief या  CMMRF Apps वर तुम्ही घरबसल्या ऑनलाईन फॉर्म, नोंदणी करू शकता.

$ads={2}

बाल स्वास्थ्य योजना ठरली संजीवनी, श्रवणशक्ती मिळाल्यानं आयुष्य पालटलं…!
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now