Mpsc Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील तंत्र शिक्षण संचालनालयांतर्गत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, शासकीय औषध निर्माण महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ या संवर्गातील 266 जागांसाठी पद भरती करीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
'एमपीएससी'अंतर्गत 266 जागांसाठी भरती!
पदांची नावे आणि पदसंख्या
- विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ - 149 जागा
- विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ - 108 जागा
- सहायक प्राध्यापक, शासकीय औषधनिर्माण महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिक शिक्षक सेवा, गट-अ - 6 जागा
- वैद्यकीय अधिक्षक, गट-अ - 3 जागा
- एकूण रिक्त जागा - 266
वेतनश्रेणी
- विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ - 57 हजार 700 रुपये
- विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ - 31 हजार 400 रुपये
- सहायक प्राध्यापक, शासकीय औषधनिर्माण महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिक शिक्षक सेवा, गट-अ - 57 हजार 700 रुपये
- वैद्यकीय अधिक्षक, गट-अ - 72 हजार 600 ते 2 लाख 16 हजार 600 रु.
ऑनलाईन अर्ज करण्याच्या महत्वाच्या तारखा - MPSC Application Form 2023 Last Date
- ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात : 5 सप्टेंबर 2023
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 सप्टेंबर 2023
परीक्षेचे स्वरूप : अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या पदांसाठी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. ज्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. हि परीक्षा २०० गुणांसाठी असून २ प्रश्नपत्रिका असतील. लेखी परीक्षेबाबत आयोगाच्या संकेतस्थळावरच प्राप्त होतील. या परीक्षेच्या गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल.
अधिकृत वेबसाईट : https://mpsc.gov.in/
https://mpsc.gov.in/adv_notification?m=8 या लिंकवर भेट देऊन त्यामध्ये प्रत्येक संवर्गाची स्वतंत्र अधिसूचना पीडीएफ स्वरूपात वाचता येईल.
पनवेल महानगरपालिकेत 377 जागांसाठी मोठी भरती! ऑनलाईन अर्ज येथे करा