Mahajyoti Police Bharti 2023 : महाज्योती या संस्थेद्वारे राबविण्यात येणाऱ्या पोलीस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण-2023 (Police Recruitment Exam Pre-Training-2023) योजनेद्वारे विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आलेले होते, यामध्ये एकूण-19196 अर्ज प्राप्त झाले होते. त्यानुसार कागदपत्रे तपासणी करुन पोलीस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण-2023 साठी निवड परीक्षेकरीता पात्र एकूण - 16863 व अपात्र एकूण- 2333 ठरलेले आहेत. तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु आहेत, लिंक खाली दिलेली आहे.
$ads={1}
महाज्योती पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण यादी जाहीर
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर संस्थेकडुन पोलीस भरती परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता OBC/VJNT/SBC या संवर्गातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यातआले होते. त्यानुसार निवड परीक्षेकरीता पात्र व अपात्र विद्यार्थ्यांची यादी दि.08 सप्टेंबर 2023 रोजी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
$ads={2}
IBPS PO, LIC AAO परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण आणि दरमहा 6000 रुपये मिळणार!
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (Mahajyoti), नागपूर या संस्थेमार्फत यंदा Institute of Banking Personnel Selection (IBPS) Probationary Officer (PO) तसेच Life Insurance Corporation of India (LIC) तर्फे Assistant Administrative Officer (AAO) या पदासाठी महाज्योतीमार्फत नागपूर व छत्रपती संभाजी नगर या दोन शहरामध्ये एकूण 600 विद्यार्थ्यांना मोफत अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सोबतच विद्यावेतन देखील मिळणार आहे. तेव्हा इच्छुक व गरजू उमेदवार या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घेऊ शकता, ऑनलाईन अर्ज येथे करा.