Lic Agents and Employees News : केंद्रीय वित्त मंत्रालयाने 18 सप्टेंबर 2023 LIC अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (LIC Agents) आणि कर्मचाऱ्यांच्या (Employees) लाभासाठी अनेक कल्याणकारी उपाययोजनांना मंजुरी दिली, LIC (Agents) नियमन 2017 मधील सुधारणा, ग्रॅच्युइटी (Gratuity) (उपदान/ विशिष्ट वर्षांनंतर सेवेतून मुक्त किंवा सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला मिळणारी रक्कम) मर्यादेत वाढ आणि कौटुंबिक निवृत्तिवेतनाचा (Family Pension) समान दर यांच्याशी संबंधित या कल्याणकारी उपाययोजचा मंजूर करण्यात आल्या आहेत.
एलआयसी एजंट आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणकारी उपाययोजनांना मंजुरी
LIC एजंटसाठी ग्रॅच्युइटीची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे एलआयसी एजंट्सच्या कामकाजाच्या स्थितीत लक्षणीय सुधारणा होऊन त्यांना लाभ मिळणार आहे.
पुनर्नियुक्त केलेल्या एजंटना पुनर्नूतनीय कमिशनसाठी पात्र होण्यासाठी सक्षम करून त्यांना अधिक आर्थिक स्थैर्य पुरवणे. सध्या, एलआयसी एजंट जुन्या एजन्सी अंतर्गत पूर्ण झालेल्या कोणत्याही व्यवसायावर पुनर्नूतनीय कमिशनसाठी पात्र ठरत नाहीत.
एजंट्ससाठी टर्म इन्शुरन्स/मुदत (Term Insurance, Term Insurance Cover) विमा कवच सध्याच्या श्रेणीवरून वाढवण्यात आले आहे. ते 3,000 रुपयांवरून 10,000 रुपये तर 25,000 रुपयांवरून 1,50,000 रुपये करण्यात आले आहे. यामुळे निधन झालेल्या एजंटच्या कुटुंबीयांना महत्त्वपूर्ण लाभ मिळणार आहे.
एलआयसी कर्मचार्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी 30% या समान दराने कौटुंबिक निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एलआयसीच्या विकासात आणि देशात विमा विस्तार अधिकाधिक करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या 13 लाखांहून अधिक एजंटना आणि 1 लाखांहून अधिक नियमित कर्मचाऱ्यांना या कल्याणकारी उपाययोजनांचा लाभ होणार आहे.