ESIC: सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना; नवीन 19.88 लाख कर्मचाऱ्यांची नोंदणी

Employees State Insurance Corporation (ESIC) : सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ESIC ही आरोग्य विमा (Health Insurance) योजना आहे. केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना राबविली जाते. नुकतेच कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार जुलै 2023 मध्ये 19.88 लाख नवीन कर्मचारी महामंडळाशी जोडले गेले आहेत. जुलै 2023 मध्ये सुमारे 27,870 नवीन आस्थापनांची नोंदणी करण्यात आली असून, त्यांना कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे सामाजिक सुरक्षा कवच प्रदान करण्यात आले आहे, त्यामुळे सुरक्षा कवचाची व्याप्ती वाढली आहे. योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या..

$ads={1}

सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना

employees state insurance corporation

ESIC कर्मचारी राज्य विमा योजना काय आहे?

ESIC ही एक कर्मचाऱ्यांसाठी असणारी कर्मचारी विमा योजना आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ही आरोग्य विमा (Health Insurance) योजना आहे. ज्या संस्थेमध्ये 10 ते 20 कर्मचारी किंवा अधिक कर्मचारी असल्यास ही विमा योजना लागू होते. केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना राबविली जाते. ESIC मध्ये कर्मचारी आणि Company, या दोघांच्या रक्कमेचं योगदान असतं. ही रक्कम वेळो-वेळी बदलत असते. 

ESIC विमा योजनेचे फायदे

ESIC योजनेंतर्गत कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबास Medical सुविधा पुरवल्या जातात. या योजनेमध्ये मोफत उपचाराची सुविधा कर्मचाऱ्यांना मिळते. ESIC च्या हॉस्पिटल मध्ये कर्मचाऱ्यांना मोफत उपचार सुविधा मिळते. आवश्यकतेनुसार गंभीर आजारावर खासगी रुग्णालयात उपचार घेता येतात, यादरम्यानचा संपूर्ण खर्च ESIC द्वारा केला जातो.

कर्मचारी एखाद्या गंभीर आजाराने ग्रस्त असल्यामुळे नोकरी करण्यास असमर्थ असल्यास ESIC कडून कर्मचाऱ्यांना पगाराच्या ७० टक्के रक्कम देण्यात येते. जर कर्मचाऱ्यास काही कारणामुळे दिव्यांग्त्व आल्यास, पगाराच्या ९० टक्के रक्कम दिली जाते. कायमस्वरुपी अपंगत्वावर आजीवन पगाराच्या ९० टक्के पगार देण्याची सुविधा या विमा योजनेत आहे.

कर्मचारी राज्य विमा महामंडळ विमा योजनेत नवीन 19.88 लाख कर्मचाऱ्यांची नोंदणी

कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने जारी केलेल्या तात्पुरत्या वेतनपट अहवालामधून असे आढळून आले आहे की, जुलै 2023 मध्ये 19.88 लाख नवीन कर्मचारी महामंडळाशी जोडले गेले आहेत. जुलै 2023 मध्ये सुमारे 27,870 नवीन आस्थापनांची नोंदणी करण्यात आली असून, त्यांना कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे सामाजिक सुरक्षा कवच प्रदान करण्यात आले आहे, त्यामुळे सुरक्षा कवचाची व्याप्ती वाढली आहे.

आकडेवारीवरून स्पष्ट दिसून आले आहे की, देशात तरुणांसाठी अधिक रोजगार निर्माण झाले आहेत. कारण जुलै 2023 मध्ये महामंडळाशी जोडल्या गेलेल्या एकूण 19.88 लाख कर्मचार्‍यांपैकी 25 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील 9.54 लाख कर्मचाऱ्यांनी नवीन नोंदणी आहे. ही संख्‍या एकूण कर्मचार्‍यांच्या 47.9 % आहे.

कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी मोठी अपडेट

वेतनपट अहवालाचे लिंगनिहाय विश्लेषण दर्शवते की जुलै 2023 मध्ये महिला सदस्यांची एकूण नोंदणी 3.82 लाख इतकी होती. जुलै 2023 मध्ये एकूण 52 ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्यांनीही  कर्मचारी राज्य विमा योजने (ESIC) नोंदणी केल्याचे आकडेवारी दर्शविते. यावरून असे दिसून येते की, कर्मचारी राज्य विमा महामंडळ आपला लाभ समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी वचनबद्ध आहे. आकडेवारी निर्मिती ही अखंड प्रक्रिया असल्यामुळे, वेतनपट अहवाल तात्पुरता आहे.

अधिकृत वेबसाईट - https://www.esic.gov.in/

$ads={2}

हे ही वाचा : तलाठी भरती संदर्भात महत्वाची अपडेट! - आरोग्य विभागातील या कर्मचाऱ्यांच्या मानधनात मोठी वाढ! - चंद्रयान-3 स्पर्धेत सहभागी व्हा आणि लाखोंची बक्षिसे जिंका!

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now