Employees Salary : शासकीय तसेच खाजगी क्षेत्रात असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत होण्यासाठी शासन, संस्था नेहमी प्रयत्नशील असते, मात्र बऱ्याचदा अनेक कारणामुळे पगार तसेच मिळणारे इतर भत्ते, लाभ वेळेवर मिळत नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित बिघडून जाते, वेतन महिन्याच्या 5 तारखेच्या आत होण्यासाठी कर्मचारी वेळोवेळी पाठपुरावा करत असतात, आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे पगार (Employees Salary) दोन-दोन महिने उशिराने होत असल्यामुळे शासनाने एक महत्वाचे परिपत्रक दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी काढले आहे, त्यानुसार 15 सप्टेंबर पर्यंत महत्वाची माहिती मागविण्यात आली आहे, सविस्तर वाचा..
$ads={1}
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होणार?
कर्मचाऱ्यांचा पगार दोन-दोन महिने उशिरा होत असल्यामुळे अनेक अडचणी येतात, जसे कर्मचाऱ्यांना गृहकर्जाचे हप्ते, शालेय शिक्षण तसेच उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी असणाऱ्या मुलांना वेळेत पैसे पाठवता न येणे, घरभाडे वेळेत देता न येणे, स्वतः च्या तसेच कुटूंबाच्या औषधोपचारासाठी येणारी आर्थिक अडचण हया सर्व बाबींमुळे वेळेवर पगार न झाल्याने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. तसेच आर्थिक कुचंबना होत असल्याने, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे दर महिन्याचे वेतन 5 तारखेपर्यंत करण्याबाबत शासन स्तरावरून आदेश निर्गमित करण्याची विनंती करण्यात आली आहे.
अखेर! शासकीय कर्मचाऱ्यांना 1 जुलैची काल्पनिक वेतनवाढ लागू
दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजीच्या पत्रान्वये संबंधित कार्यालयांकडून पगार उशिरा होण्याबाबत, जिल्हा परिषद स्तरावरून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत का होत नाही. तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत होणेकरीता आपल्या स्तरावरून केलेले प्रयोजन याचा स्वयंस्पष्ट कारणासह अहवाल शासनाने दिनांक 15 सप्टेंबर 2023 पर्यंत मागविला आहे. त्यामुळे आता यावर लवकरात लवकर तोडगा काढून पुढील महिन्यापासून वेतन वेळेवर होण्यासाठी उपाययोजना करण्यात येईल अशी कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे.
$ads={2}
करार कर्मचाऱ्यांना सुधारित मानधन!
कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याची मागणी, शासनाकडे प्रस्ताव सादर
मोठी अपडेट ! तलाठी भरती परीक्षेच्या तारखेबाबत जाहीर सूचना! सविस्तर वाचा