Employees Salary Increase : राज्यातील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या दरमहा मानधनामध्ये मोठी वाढ करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे, यामुळे राज्यातील जवळपास 2 हजार 276 कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
आरोग्य विभागातील या कर्मचाऱ्यांच्या मानधनात मोठी वाढ!
$ads={1}
राज्यामध्ये एकूण 23 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असून, एकूण 17 संस्थानामध्ये 25000 रुपये व त्यावरील प्रचलित दराने देय होणारा महागाई भत्ता या दराने मानधन प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच उर्वरित 6 महाविद्यालयातील वरिष्ठ निवासी संवर्गातील डॉक्टरांना त्या त्या महाविद्यालयाच्या पद निर्मितीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार मानधन अदा करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी मोठी अपडेट
राज्य शासनाने 6 जानेवारी 2023 रोजी राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवर 1 हजार 432 पदे नव्याने निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली होती.राज्यातील वरिष्ठ निवासी डॉक्टर संवर्गातील एकूण मंजूर पदे आता 2 हजार 276 इतकी झाली आहे.
सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ निवासी पदावर नियुक्त होणाऱ्या डॉक्टरांना आता यापुढील 5 वर्षासाठी दरमहा 85 हजार रुपये दर सुधारित मानधन देण्याचा निर्णय राज्य शासनाने 16 सप्टेंबर 2023 रोजी घेतला आहे. यासाठी येणाऱ्या वार्षिक 12.98 कोटी खर्च मान्यता देण्यात आली आहे.
$ads={2}