Employees Increment : अखेर! शासकीय कर्मचाऱ्यांना 1 जुलैची काल्पनिक वेतनवाढ लागू, राज्य सरकारचा मोठा निर्णय!

Employees Increment : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनवाढ देण्यासंदर्भात शासनाने मोठा निर्णय घेतला आहे, असे शासकीय कर्मचारी जे दि. ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत अशा कर्मचाऱ्यांना दिनांक १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत ११ सप्टेंबर २०२३ रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 

$ads={1}

शासकीय कर्मचाऱ्यांना 1 जुलैची काल्पनिक वेतनवाढ लागू

Employees Increment

दि. ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना लगतच्या दि. १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत विविध सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून मागणी करण्यात येत होती. त्या अनुषंगाने अखेर शासनाने सुधारित सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

सुधारित वेतनवाढीची थकबाकी मिळणार

सेवानिवृत्तीवेतन सुधारीत करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, त्यानंतर याप्रमाणे अर्ज प्राप्त झाल्यानंतर, मा न्यायालयाच्या उपरोक्त आदेशाप्रमाणे संबंधितांना सुधारीत सेवानिवृत्तीविषयक लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे. तसेच सदर लाभ सुधारीत करण्यात आल्यानंतर त्यांनी अर्ज दाखल केलेल्या दिनांकाच्या मागील ३ वर्षांची थकबाकी अथवा त्यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक या पैकी जे कमी असेल तितकी थकबाकी मिळणार आहे. मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची पूर्तता करीत असलेल्या कोणत्याही सेवानिवृत्ताचा अर्ज फेटाळण्यात येऊ नये. असे वित्त विभागाने स्पष्ट केले आहे.

इतर लाभ लागू होणार (दिनांक 28 जून 2023 रोजीचा शासन निर्णय)

वरील प्रमाणे कार्यवाही केल्यानंतर मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी त्यांच्या दिनांक १६.०२.२०२३ रोजी च्या आदेशातील परिच्छेद क्रमांक ९ मध्ये नमूद केले आहे की, This Notional Inclusion Of The Annual Increment Would Be Considered For Re-calculating Their PensionGratuity, Earned Leave, Commutation Of Pension Benefits Etc. तरी त्याप्रमाणे अर्जदारास लाभ अनुज्ञेय करण्यात यावे. [शासन निर्णय]

दिनांक ७ जुलै २०२३ चा शासन निर्णय

दिनांक ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या तसेच होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत शासनाने वित्त विभागाच्या दिनांक २८ जून २०२३ अन्वये दिलेल्या सूचना आता राज्यातील खाजगी १००% अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू करण्यात आला आहे. (शासन निर्णय)

दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजीचा शासन निर्णय

आता राज्यातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, द्विलक्षी अभ्यासक्रम व पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम राबविणाऱ्या अशासकीय अनुदानित संस्थामधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील दिनांक ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्यात आली आहे, तसा शासन निर्णय 11 सप्टेंबर 2023 जारी करण्यात आला आहे. [शासन निर्णय येथे पहा]

$ads={2}

कर्मचारी अपडेट - कंत्राटी कर्मचारी बातम्या - सरकारी कर्मचारी बातम्या

$ads={2}

मोठी अपडेट! जिल्हा परिषद भरती परीक्षा वेळापत्रक जाहीर, जिल्हानिहाय वेळापत्रक

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now