Dearness Allowance News : आनंदाची बातमी! गणेशोत्सवाची कर्मचाऱ्यांना मोठी भेट, राज्यातील 'या' कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात भरघोस वाढ!

Dearness Allowance News : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात शासनाने 4 टक्के महागाई भत्ता वाढ केली आहे, त्याप्रमाणे आता गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात भरघोस वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, सविस्तर वाचा...

$ads={1}

एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ

Dearness Allowance News

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता देण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) अमृत महोत्सवी वर्धापन दिनाच्या दिवशी करण्यात आली होती. राज्य शासनाने जाहीर केलेल्या 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास व महिलांना 50 टक्के प्रवास सवलत अशा योजनांना प्रवाशांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.

गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (Dearness Allowance) 34 टक्क्यांवरुन 38 टक्के करण्याच्या प्रस्तावावर आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.

अखेर! शासकीय कर्मचाऱ्यांना 1 जुलैची काल्पनिक वेतनवाढ लागू

सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय देण्यात येते. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये 4 टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर 9 कोटी रुपयांचा बोजा पडेल.  त्याचप्रमाणे असुधारित वेतन संरचनेतील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना 212 टक्के महागाई भत्ता देण्यात येईल.

$ads={2}

मोठी अपडेट ! तलाठी भरती परीक्षेच्या तारखेबाबत जाहीर सूचना! सविस्तर वाचा

थोडक्यात एसटी..

राज्यातील 38 हजार खेड्यांना एसटीने जोडले असून 97 टक्के जनतेपर्यंत एसटी पोहोचली आहे. एसटी कडे 16 हजार 500 बस असून 250 आगार आणि 580 बस स्थानके आहेत. एसटी तर्फे रोज 53 लाख प्रवाशांची ने - आण करते. 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाचा लाभ देण्यात येत आहे, तर महिला सन्मान योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या बसमध्ये 50 टक्के तिकीट दरात सवलत देण्यात येत आहे. तसेच अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना घरापासून शाळेपर्यंत मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली आहे.

करार कर्मचाऱ्यांना सुधारित मानधन!

हे ही वाचा :  शेवटची संधी!चांगले व्याज देणारी 'ही' SBI ची लोकप्रिय FD योजना,सविस्तर जाणून घ्या

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now