Contractual Employees Pay Commission : कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नॅशनल हेल्थ मिशन NHM मध्ये कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नवीन वेतनश्रेणीचा लाभ मिळणार असून, विविध 51 संवर्गातील पदांच्या कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष पदाप्रमाणे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी निश्चित करण्यात आली आहे, यास नुकतीच वित्त विभागाने मान्यता दिली आहे. सविस्तर वाचा..
$ads={1}
कंत्राटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार नवीन वेतनश्रेणीचा लाभ!
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मध्ये कार्यालयीन डॉक्टर, कंत्राटी पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन व ग्रेड वेतन सातव्या वेतनश्रेणीनुसार निश्चित करण्यात आले आहे. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी 2 महिन्यांपूर्वी कंत्राटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली होती. ज्यात या कर्मचाऱ्यांना समकक्ष पदांप्रमाणे सातव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीचा लाभ देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर सामान्य प्रशासन विभागातील विभागांनाही आदेश देण्यात आले होते.
मोठी अपडेट! अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत महत्वाची बैठक संपन्न
नियमित कर्मचार्यांप्रमाणे मिळणार वेतन
राज्यातील बहुतांश पदे ही समकक्ष पदानुसार कार्यरत असून, त्यांना आता नियमित कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने वेतन देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता, आता नियमित कर्मचार्यांचे मूळ वेतनाच्या 90 टक्के दराने प्रारंभिक वेतन देण्याचे धोरण बंद करून कर्मचार्यांना 100 टक्के (मूळ वेतनाच्या) सुरुवातीचे वेतन मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले होते. त्यानुसार आता राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मध्ये कार्यरत असणाऱ्या विविध 51 संवर्गातील पदांच्या कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष पदाप्रमाणे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी निश्चित करण्यात आली आहे, यास नुकतीच वित्त विभागाने मान्यता दिली आहे.
वित्त विभागाची मंजुरी
12 सप्टेंबर रोजीच राज्य आरोग्य समितीच्या प्रशासकीय समितीच्या बैठकीत वेतनश्रेणी (ग्रेड पे) वेतन निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ज्याला वित्त विभागाची मंजुरी मिळाली आहे. आता वित्त विभागाची मान्यता मिळाल्यानंतर NHM मध्ये कंत्राटी पदांवर कार्यरत असलेल्या 51 संवर्गातील डॉक्टर अधिकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतनश्रेणीनुसार वेतन देण्यात येणार आहे. वेतनश्रेणी लागू झाल्यानंतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पगारात 2000 ते 15000 रुपयांची वाढ होणार आहे. पदनिहाय वेतनश्रेणी पहा लिंक खाली दिलेली आहे.
$ads={2}
मोठी बातमी! कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार, महत्वाची बैठक संपन्न
महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.
महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.