Building Workers : राज्यातील कामगारांच्या विविध मागण्यांबाबत महत्वाची बैठक संपन्न, कामगारांच्या 'या' मागण्या मान्य!

Building Workers : कामगार विभाग, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ आणि सिटू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मंत्रालयातील परिषद सभागृहात 13 सप्टेंबर रोजी संपन्न  झाली. या बैठकीमध्ये Building Workers कामगारांच्या संदर्भात महत्वाच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करून काही निर्णय घेण्यात आले सविस्तर वाचा..

कामगारांसाठीच्या 'तपासणी ते उपचार' योजनेत प्रत्येक जिल्ह्यातील 5 रुग्णालये व रोग निदान केंद्र संलग्न करणार

Building Workers

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार (Building Workers) कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून कामगारांसाठी 'तपासणी ते उपचार' ही आरोग्य योजना राबविण्यात येत असून योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 5 रुग्णालये व रोग निदान चाचणी केंद्र संलग्न करण्यात येणार आहेत. यात कामगारांच्या कुटुंबाला 2 लाखांपर्यंतचे उपचार मिळणार असून 5 हजारांची औषधे आणि 23 तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. या योजनेत  कामगाराच्या संपूर्ण कुटुंबाला लाभ मिळणार असल्याची माहिती कामगारमंत्री तथा कामगार  कल्याण मंडळाचे अध्यक्ष सुरेश खाडे यांनी दिली.

कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीत वाढ होणार

कामगारांच्या पाल्यांना बी.फार्म. करण्यासाठी 25 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते, या रकमेत वाढ करण्यासोबतच Ph.D. आणि M.Phil करणाऱ्या  विद्यार्थ्यांना विद्यावेतन लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. बांधकाम कामगारांना 'मध्यान्ह भोजन' ही योजना अतिशय उत्तमप्रकारे सुरू आहे. यात कुठलाही बदल करण्यात येणार नाही. या योजनेच्या माध्यमातून लाखो नोंदणीकृत कामगारांना मोफत जेवण मिळत असल्याचेही मंत्री श्री. खाडे यांनी सांगितले.

मोठी बातमी! कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार यांच्या हितासाठी कल्याणकारी मंडळ विविध योजना राबवत असून यापुढेही कामगारांचे आरोग्य (Workers Health), घरकुल, मुलांचे शिक्षण यावर भर देणार असल्याचे, मंत्री श्री. खाडे यांनी सिटू संघटनेने कामगारांसाठी केलेल्या विविध मागण्यांसंदर्भात आयोजित बैठकीत सांगितले.

मुंबई व राज्यातील इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी कामगारांना नाक्यावर थांबण्यासाठी शेड उभारणी करणार असून त्याठिकाणी पाणी, स्वच्छतागृह यासारख्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, तसेच कामगारांच्या मदतीसाठी लवकरच हेल्पलाईन सुरू करणार असून कामगार विभागात लवकरच भरती प्रक्रिया राबवणार आहे. त्याचबरोबर राज्यात मोठ्या संख्येने बांधकाम चालू आहे. यातून मंडळाचा उपकर वाढविण्यासाठी कामगार संघटनांनीही सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री श्री. खाडे यांनी यावेळी केले.

हे ही वाचा : अखेर! शासकीय कर्मचाऱ्यांना 1 जुलैची काल्पनिक वेतनवाढ लागू - सरकारी नोकरी महा भरती जाहिराती येथे पहा - बाह्ययंत्रणेमार्फत नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी नवीन शासन निर्णय

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now