7th Pay Commission Salary : राज्यातील अधिकारी, कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी (Employee) एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की, दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी माहे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे वेतन आणि सातव्या वेतन आयोगानुसार चौथ्या हप्त्याची थकबाकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे, त्यामुळे आता राज्यातील या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, महत्त्वाचे दोन शासन निर्णय 12 सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आले आहे.
$ads={1}
सातव्या वेतन आयोगानुसार थकबाकीचा 4 था हप्ता मंजूर
समग्र शिक्षा अभियानांतर्गत शिक्षक शिक्षण (Teacher Education) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत सन २०२३-२०२४ या वित्तीय वर्षासाठी माहे ऑगस्ट व सप्टेंबर २०२३ चे नियमित वेतनाकरिता तरतूद वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत शिक्षक शिक्षण (Teacher Education) ही केंद्र पुरस्कृत (६०:४०) योजना आहे. राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे माहे- ऑगस्ट, सप्टेंबर, २०२३ चे नियमित वेतन व सातवा वेतन आयोग (7th Pay Commission) फरक थकबाकीचा ४ था हप्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. {शासन निर्णय}
राज्यातील या अधिकारी व कंत्राटी कर्मचारी यांचे वेतन अनुदान मंजूर
महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी यांच्या वेतनावरील मासिक खर्च वेतन/वार्षिक खर्च, प्राधिकरणाचे जागेचे मासिक / वार्षिक भाडे, कार्यालयीन साहित्य सामुग्री व इतर संकिर्ण बाबीवरील खर्च याच्या तपशीलासह व आवश्यक कागदपत्रांसह आवश्यकतेनुसार निधी मंजूर करण्यात आला आहे.
मोठी बातमी! कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतनसन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाच्या आस्थापनेकरीता अधिकारी, कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी यांचे वेतन, इतर कार्यालयीन साहित्य सामुग्री व इतर संकीर्ण बाबी, तसेच प्राधिकरण इमारत भाडे या बाबींची पूर्तता करण्यासाठी सहायक अनुदाने (वेतनेतर) व सहायक अनुदाने (वेतन) अंतर्गत वित्त विभागाने पुरवणी मागणीदृवारे मंजूर केलेला निधी वितरीत करुन खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. {शासन निर्णय}
$ads={2}
हे ही वाचा : कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याची मागणी, शासनाकडे प्रस्ताव सादर- अखेर! शासकीय कर्मचाऱ्यांना 1 जुलैची काल्पनिक वेतनवाढ लागू - सरकारी नोकरी महा भरती जाहिराती येथे पहा