7th Pay Commission DA Latest News: सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्यात वाढ होण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक All India Consumer Price Index (AICPI) ची आकडेवारी महत्वाची असते, या आकडेवारी नुसार सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात (DA) मध्ये वाढ करत असते, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा वाढ करण्यात येते, 24 मार्च रोजी कर्मचाऱ्यांचा DA 38 वरून 42 टक्के वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यानुसार सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 42 टक्के प्रमाणे मिळत असून, हा लाभ 1 जानेवारी 2023 पासून लागू आहे. महागाई भत्ता वाढीसह पगारात कितीने वाढ होणार सविस्तर जाणून घ्या.
$ads={1}
सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी मोठी अपडेट!
केंद्र सरकारने या संदर्भात सध्या कोणतीही घोषणा केले नसले तरीही, CPI-IW चे आकडे पाहता अशी आशा व्यक्त केली जात आहे की, केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय हा कामगार ब्युरोने जारी केलेल्या आकडेवारीनुसार म्हणजेच CPI-IW च्या आधारे केंद्र सरकार घेते. जुलै 2023 महिन्याची CPI-IW आकडेवारीनुसार CPI-IW 3.3 अंकांनी वाढून 139.7 वर पोहोचला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीशी तुलना केल्यास, यात सुमारे 0.95 टक्के वाढ दिसून येत आहे.
महागाई भत्ता हा वर्षातून दोनवेळा वाढवण्यात येतो, या सहामाहीतील महागाई भत्ता वाढ ही लवकरच कर्मचाऱ्यांना मिळू शकते, यानुसार आता सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्यात 3% वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजेच सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42% प्रमाणे DA मिळत आहे, यामध्ये 3 टक्के वाढ म्हणजे एकूण 45 टक्के वाढ होऊ शकते.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने DA मिळतो आणि त्यात 3 टक्के वाढ जाहीर केली जाऊ शकते. असे झाल्यास DA 45 टक्के होईल आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल. कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्यात केंद्र सरकार वर्षातून दोन वेळा वाढ करते. या वर्षातील पहिली वाढ म्हणजेच DA वाढ 24 मार्च 2023 रोजी करण्यात आली आणि वाढीव महागाई भत्त्याचा लाभ कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आला आहे.
त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा डीए 38 वरून 42 टक्के करण्यात आला आहे. यावेळीही कर्मचारी 4 टक्के वाढ करण्याची मागणी करत आहेत, मात्र एका मोठ्या मिडिया वृत्तांवर विश्वास ठेवला तर सरकार त्यात 3 टक्क्यांपर्यंत वाढ करेल अशी अपेक्षा आहे. डीए मध्ये ही तीन टक्के वाढ केल्यास 1 जुलै 2023 पासून कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळेल.
एक कोटीहून अधिक कर्मचारी-पेन्शनधारकांना मिळणार लाभ
एक कोटीहून अधिक कर्मचारी-पेन्शनधारकांना दिवाळीपूर्वी डीए वाढ मिळेल या आशेवर केंद्र सरकारकडून सध्या कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. विविध अहवालातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन हा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, सरकारने महागाई दराच्या आधारे कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्यास देशातील सुमारे एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्याचा लाभ होणार आहे. यामध्ये 47.58 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69.76 लाख पेन्शनधारकांचा समावेश आहे.
महागाई भत्ता वाढीसह पगारात होणार 'इतकी' वाढ
आता कर्मचार्यांना 3 टक्के डीए वाढीची भेट मिळण्याची शक्यता आहे आणि महागाई भत्ता 45 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यानुसार पगारवाढ किती वाढू शकते? जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18,000 रुपये असेल आणि त्याला सध्या 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळत असेल, तर तो 7,560 रुपये होतो. जर ते 45 टक्के वाढले तर रक्कम 8,100 रुपये होईल. म्हणजेच कर्मचाऱ्यांचा पगार थेट 540 रुपयांनी वाढणार आहे. आता जर आपण कर्मचार्यांचे कमाल मूळ वेतन 56,900 रुपये असेल, तर सध्या त्यावर 23,898 रुपये डीए आहे, तर तीन टक्के वाढीनंतर ते 25,605 रुपये इतकी वाढ होईल.
$ads={2}
आणखी वाचा - कंत्राटी कर्मचाऱ्यांना 'या' तारखेपासून मानधन वाढ मिळणार, शासन आदेश
कर्मचारी अपडेट - कंत्राटी कर्मचारी बातम्या - सरकारी कर्मचारी बातम्या
मोठी अपडेट! जिल्हा परिषद भरती परीक्षा वेळापत्रक जाहीर, जिल्हानिहाय वेळापत्रक