Talathi Exam Hall Ticket Link : तलाठी भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना हॉल तिकीट हे त्यांच्या लॉगीन आयडीवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी त्यांचे ईमेल व युजर आयडी याबाबत संपर्कात राहावे. असे भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे
राज्यातून तलाठी भरतीसाठी 10 लाख 41 हजार 713 ऑनलाईन अर्ज
महसूल विभागातील गट- क (Group-C) संवर्गातील तलाठी भरती सन 2023 ही TCS कंपनीमार्फत घेण्यात येत आहे. सदरच्या तलाठी परीक्षेकरीता राज्यभरातून 10 लाख 41 हजार 713 उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले आहे.
तलाठी भरती परीक्षेची वेळ - Talathi Exam Shift Timings
- सत्र १ ले - सकाळी ९.०० ते ११.००
- सत्र २ रे - दुपारी १२.३० ते २.३०
- सत्र ३ रे - सायंकाळी - ४.३० ते ६.३०
तलाठी भरतीसाठी प्रवेशपत्रे (Hall Ticket) जाहीर
तलाठी भरती परिक्षेचे प्रवेश पत्र (Hall Ticket) या दिवशी उपलब्ध होणार (Talathi Bharti Hall Ticket) : तलाठी परीक्षेकरीता TCS कंपनीमार्फत होत असून, सदरची परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात 3 सत्रामध्ये 19 दिवस होणार आहे. मोठ्या प्रमाणावर परीक्षार्थी यांची संख्या असल्याने तसेच Cyber Security ची खबरदारी म्हणून तसेच ऑनलाईन गैरप्रकार, अनुचित प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कारणाने परीक्षेच्या तारखेच्या 3 दिवस आधी प्रवेशपत्र (Talathi Hall Ticket) प्रत्येक परीक्षार्थी यांच्या Login Id वर उपलब्ध केले जाईल याची कृपया नोंद घ्यावी. असे प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
तलाठी हॉल तिकीट 2023 कसे डाउनलोड करावे? | How to Download Talathi Hall Ticket 2023?
- सर्वप्रथम E-Mahabhumi च्या अधिकृत वेबसाईट वर जा (Hall Ticket Download डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे.)
- तलाठी भरती 2023 फॉर्म भरतांना तुम्हाला मिळालेला Login ID आणि Password टाकून लॉग इन करा.
- आता पदाच्या समोरच्या Eye या बटनावर क्लिक करा.
- आता तुम्हाला तुमचे तलाठी प्रवेशपत्र (Talathi Hall Ticket 2023) दिसेल.
- आता Talathi Hall Ticket Download करा.