Talathi Employees Government Circular : राज्यामध्ये तलाठी पदाच्या 5 हजार 38 जागा रिक्त असून, या रिक्त पदांपैकी 4 हजार 644 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून, सद्यस्थितीत तलाठी भरती (Talathi Bharti) परीक्षा सुरु आहे. आता नवीन पदभरती तलाठी उमेदवार लवकरच नियुक्त होणार आहेत. दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी शासनाने तलाठी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक महत्वाचे शासन परिपत्रक काढले आहे.
$ads={1}
तलाठी मंजूर पदे: तलाठी सज्जाच्या ठिकाणी उपस्थित राहत नसलेबाबत जनतेकडून तसेच लोकप्रतिनिधींकडून वारंवार शासनास तक्रारवजा सूचना/निवेदने प्राप्त होत असतात. सद्यस्थितीत तलाठी गट-क संवर्गाची एकूण मंजूर पदे 15,744 इतकी असून त्यापैकी 5038 इतकी पदे रिक्त आहेत. त्यामुळे एका तलाठ्याकडे एकापेक्षा जास्त सज्जाचा कार्यभार सोपविण्यात येतो. मात्र आता लवकरच राज्यातील तलाठी कर्मचाऱ्यांच्या कामाचा भार हलका होणार आहे. राज्यातील तलाठी भरतीसाठी 4 हजार 644 जागांसाठी 10 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक अर्ज आले असून, त्यांनतर रायगड मध्ये तलाठी भरतीसाठी अर्ज प्राप्त्र झाले आहे.
तलाठ्याचे काम काय? : तलाठी हे क्षेत्रीय स्तरावरील सर्व सामान्य नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे पद असून, जनतेस आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो. तसेच शेतक-यांशी निगडित पीक पाहणीची ई-पिक पाहणी या मोबाईल APP द्वारे नोंदणी करणे, नुकसानीचे पंचनामे करणे, दुष्काळ, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती इत्यादी प्रसंगी मदत व पुर्नवसनाचे काम करणे यासाठी तलाठी हे अतिशय महत्वाचा दुवा आहेत.
हे ही वाचा - कंत्राटी कर्मचारी लेटेस्ट शासन निर्णय - सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा शासन निर्णय पहा - मोठा निर्णय! वेळेआधी पगार मिळणार पहा
तलाठ्यांना सजातील गावांना भेटी देणे, पंचनामे, स्थळपाहणी, वरिष्ठ कार्यालयांकडे असणाऱ्या बैठका, राजशिष्टाचार पाहणी, तपासण्या इत्यादी कामी उपस्थित रहावे लागते.
तलाठी भरतीचे लेटेस्ट अपडेट येथे पहा
तलाठी पदांची भरतीप्रक्रिया पूर्ण होवून नवीन उमेदवार उपलब्ध होईपर्यंत एका तलाठ्याकडे एकापेक्षा जास्त सज्जाचा कार्यभार राहणार आहे. तथापि जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, याकरीता सर्व तलाठी यांनी सज्जाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याबाबतचे वेळापत्रक संदर्भात महत्वाचे शासन परिपत्रक दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी निर्गमित करण्यात आले आहे.
$ads={2}
तलाठी कर्मचारी संदर्भात शासन परिपत्रक येथे डाउनलोड करा