मोठी अपडेट ! तलाठी भरती परीक्षेच्या वेळापत्रकात झाला मोठा बदल! जाहीर निवेदन सविस्तर वाचा...

Talathi Bharti Shift Time : राज्यातील सर्व तलाठी भरतीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना TCS कंपनीच्या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल झाला आहे, याबाबत राज्य परिक्षा समन्वयक तलाठी भरती परिक्षा 2023 यांनी जाहीर निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे. सविस्तर वाचा..

$ads={1}

तलाठी भरती परीक्षा २०२३ दिनांक २१/०८/२०२३ रोजी राज्यातील ३० जिल्हे व ११५ टीसीएस केंद्रावरती नियोजीत करणेत आली होती. सदर परिक्षेच्या वेळापत्रकानुसार सकाळी पहिले सत्र ९.०० ते ११.०० नियोजीत करणेत आले होते. तथापी TCS कंपनीच्या डेटा सेंटर सर्व्हर मध्ये तांत्रिक बिघाड झालेने सदरचे सत्र वेळेनुसार सुरु करणेस अडचण निर्माण झाली. 

यासंदर्भात TCS कंपनीकडून राज्य समन्वय कार्यालयास परिक्षा उशीरा सुरु होणेबाबत कळविण्यात आले. TCS कंपनी व त्यांचे डेटा सेंटर यांनी सर्व देशभरातील परिक्षासंदर्भातील हा तांत्रिक बिघाड झाला असल्याने वरिष्ठ वैज्ञानिक यांच्या स्तरावर याबाबत युध्द पातळीवर हा तांत्रिक बिघाड शोधून परिक्षा ११.०० वाजता सर्व केंद्रवार सुरु करणेबाबत कळविणेत आले. 

राज्य समन्वयक यांनी सर्व निवासी उप जिल्हाधिकारी यांचेशी संपर्क करुन प्रथम सत्रातील विद्यार्थ्याना नियोजीत परिक्षा उशीरा सुरु होईल असे कळविणेत आले. त्याप्रमाणे सर्व परिक्षाकेंद्रांवरील परिक्षार्थीना याची सुचना देण्यात आली.

TCS कंपनीकडून तांत्रिक बिघाड दूर करणेत येवून राज्यातील सर्व ११५ केंद्रावर परिक्षा सुरु करणेबाबत सुचना मिळाल्यानंतर सर्व परिक्षा केंद्रातील अधिकाऱ्यांना याबाबत सुचित करणेत येवून परिक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला असून राज्यातील सर्व ११५ केंद्रावर ११.०० वाजता परिक्षा सुरु करणेत आली आहे.

राज्यातील सर्व तलाठी भरतीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना TCS कंपनीच्या तांत्रिक बिघाडामुळे आज होणाऱ्या तीनही सत्रातील परिक्षा नियोजीत वेळेपेक्षा दोन तास उशिरा सुरु होतील. त्याप्रमाणे बदलेल्या वेळेबाबत सर्व परिक्षा केंद्रावर सुचना प्रसारित करणेची कार्यवाही निवासी उपजिल्हाधिकारी यांचे मार्फत परिक्षा केंद्राना देण्यात आल्या आहे. 

तरी सर्व परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी महसूल प्रशासन / पोलीस प्रशासन तसेच टीसीएस कर्मचारी यांना सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे. सर्व परिक्षार्थीना नियोजीत दोन तासांचा वेळ परिक्षेसाठी देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग परिक्षार्थी यांना आजचे सत्र दोन मध्ये अतिरिक्त देय असणारा वेळ देण्यात येणार आहे.

तलाठी भरती परीक्षा निकाल 2023 - कट ऑफ येथे पहा

तलाठी भरती हॉल तिकीट डाउनलोड - डायरेक्ट लिंक

Talathi Bharti Shift Time

तलाठी भरती जाहीर निवेदन डाउनलोड करा - डायरेक्ट लिंक

तलाठी भरती परीक्षेची वेळ - Talathi Exam Shift Timings


सदर परिक्षा दि.१७ ऑगस्ट २०२३ ते दि.१४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत १९ दिवस असणार आहे. सदर परिक्षा ३ सत्रात आयोजित करणेत आलेली आहे. 

  1. सत्र १ ले - सकाळी ९.०० ते ११.०० 
  2. सत्र २ रे - दुपारी १२.३० ते २.३०
  3. सत्र ३ रे - सायंकाळी - ४.३० ते ६.३०

अधिकृत वेबसाईट - https://mahabhumi.gov.in/mahabhumilink#

 
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now