राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी, कुटुंब निवृत्ती वेतन, मृत्यू उपदान, रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यासंदर्भात दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी शासनाने DCPS आणि NPS योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे, सविस्तर पाहूया..
दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त व परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली (National Pension System) लागू असलेल्या कर्मचाऱ्याचा सेवेत असतांना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान लागू करण्यात आले आहे.
$ads={1}
तसेच रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवा उपदान लाभ देखील मिळणार आहे. तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आले आहे.
त्यानुसार सदर कुटुंब निवृत्तिवेतनधारकास व समता निवृत्तिवेतनधारकास महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्तिवेतन / रुग्णता निवृत्तिवेतन लागू होईल. याबाबत दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास विभागाने शासन आदेश जारी केले आहे.
जुनी पेन्शन योजनेतील हे लाभ मिळणार
- सेवेत असतांना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान,
- रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवा निवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे.
- तसेच विद्यापीठ सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे.
हे ही वाचा - कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन, दिवाळी बोनस -कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार 15,144 रुपयांची वाढ - तब्बल 3049 जागांसाठी मेगा भरती - ऑनलाईन अर्ज
राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या 'वारसांना' जुनी पेन्शन योजना लागू
राज्यातील कृषि विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अनुदानित संस्था महाविद्यालयांमधील अधिकारी / कर्मचारी यांतील परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना, कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान, तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करण्यात आले आहे.
$ads={2}
जुनी पेन्शन योजना - शासन निर्णय येथे पहा