Festival Allowance : सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांसाठी एक आनंदाची बातमी, तुम्ही जर केंद्र सरकारचे कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबात किंवा मित्र परिवारात कोणी केंद्र सरकारी कर्मचारी अथवा सेवानिवृत्त कर्मचारी असेल तर ही महत्वाची अपडेट तुमच्यासाठी आहे, ऑगस्ट महिना सुरु होताच सण/उत्सवाला सुरुवात होते, आणि याच धर्तीवर केंद्र सरकारने कर्मचारी व निवृत्तीवेतन धारकांना त्यांच्या सणाच्या निमित्ताने (Festival Allowance) वेळेत वेतन व पेन्शन अग्रिम देय करण्यासाठी एक महत्वाचे परिपत्रक काढले आहे.
$ads={1}
केंद्र सरकारने जारी केलेल्या (Office Memorandum) आदेशानुसार महाराष्ट्र राज्यातील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सप्टेंबर २०२३ मध्ये गणपती उत्सवाच्या (Ganpati Festival) निमित्ताने वेतन आणि निवृत्तिवेतन सण अग्रिम देण्याबाबत कळविण्यात आले आहे. तसेच केरळ राज्यातील केंद्रीय कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांना ऑगस्ट २०२३ मध्ये ओणम (ONAM Festival) उत्सवाच्या निमित्ताने अग्रिम देय करण्याबाबत केंद्र सरकारकडून संबधित कार्यालयांना कळविण्यात आले आहे.
'ओणम' आणि ‘गणपती’ उत्सवाच्या निमित्ताने, सरकारने केरळ राज्यातील सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांचे २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांचे २७ सप्टेंबर २०२३ पर्यंत वेतन/निवृत्तिवेतन अदा करण्याबाबत केंद्र सरकारच्या कार्यालयांद्वारे (संरक्षण,पोस्ट आणि दूरसंचारासह) अग्रिम देय करण्याबाबत कार्यालयीन परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे आता राज्यातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना सण अग्रिम वेळेत मिळणार आहे.
हे ही वाचा - कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा - सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! - पनवेल महानगरपालिकेत मोठी भरती सुरु - MIDC मध्ये 802 जागांसाठी जम्बो भरती
महाराष्ट्रातील केंद्र सरकारी कर्मचार्यांचे सप्टेंबरचे वेतन 27 सप्टेंबर 2023 रोजी पर्यंत तसेच महाराष्ट्रातील सर्व केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांची पेन्शन देखील या तारखेला बँका/पीएओद्वारे वितरित केली जाणार आहे. पुढे, पगार आणि पेन्शन वाटप आगाऊ पेमेंट म्हणून मानले जाईल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. असे वितरीत केलेले पगार, पेन्शन हे आगाऊ पेमेंट मानले जाईल आणि प्रत्येक कर्मचारी, पेन्शनधारकाचे पूर्ण महिन्याचे पगार, पेन्शन निश्चित झाल्यानंतर समायोजन केले जाईल. असे वित्त मंत्रालयाने कार्यालयीन आदेशात म्हंटले आहे. [परिपत्रक पहा]
सविस्तर वाचा - तलाठी भरती हॉल तिकीट बाबत लेटेस्ट अपडेट पहा