Old Pension Scheme Vs New Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात देशभरामध्ये चर्चेचा विषय बनला आहे. बहुतांश राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी होत असून, काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. तर काही राज्यात नवीन पेन्शन योजनेत बदल करण्याची मागणी होत आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी काही दिवसापूर्वी दिल्लीतील रामलीला मैदानावर पेन्शन शंखनाद रॅलीत लाखो कर्मचारी सहभागी झाले होते. मात्र अजूनही बऱ्याचदा जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजनामधील फरक काय आहे? हेच लक्षात येत नाही, जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेतील फरक जाणून घेण्यासाठी हे आर्टिकल अवश्य वाचा..
जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजनामधील फरक
सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना NPS मध्ये दिलेल्या योगदानाच्या आधारे पेन्शन दिले जाते. तर जुनी पेन्शन योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या शेवटच्या पगाराच्या 50% रक्कम ही पेन्शन म्हणून दिली जाते. जुनी पेन्शन योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या पगाराच्या 50 टक्के रक्कम ही पेन्शन म्हणून कर्मचाऱ्यांना मिळते, तर या दरम्यान नोकरीच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे योगदान कर्मचाऱ्यांना द्यावे लागत नाही. मात्र राष्ट्रीय पेन्शन योजनेत (NPS) कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या 10% आणि सरकारचे 14% असे योगदान त्यांच्या NPS मध्ये जमा होऊन त्यांना पेन्शन योजनेचा लाभ दिला जातो. जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना यामध्ये रिटर्न निश्चितता, कर लाभ, पात्रता, योगदान, लवचिकता इत्यादीसारख्या अनेक समस्यांचा समावेश आहे.
$ads={2}