Msrtc Employees News : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्याचा पगार होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, पगारासाठी आवश्यक निधी सरकारने महामंडळाला 334 कोटी 42 लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे, त्यामुळे आता लवकरच एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा होण्याची शक्यता आहे, असे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
$ads={1}
सरकारकडून जून महिन्याच्या सवलत मूल्याच्या प्रति पूर्तिपोटी निधी एसटी महामंडळाला देण्यास मान्यता मिळाली असून, तो महामंडळाच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगार साधारणपणे महिन्याच्या 7 तारखेपर्यंत होत असतो, मात्र ही तारीख जरी चुकली असली तरी 10 तारखेच्या आत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पगार जमा केला जाईल, असा विश्वास एसटी महामंडळाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
ST महामंडळाच्या बसमध्ये एकूण 24 विविध सामाजिक घटकांना प्रवास सवलत देण्याची सरकारची योजना आहे. राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस (ST) प्रवास सवलत आहे. नुकतेच सरकारने राज्याच्या आर्थिक बजेट मध्ये सर्व महिलांना बस मध्ये भाडे दरात 50% सवलत देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील 5 वी ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थिनीं साठी साध्या बसमध्ये 100% टक्के सवलत आहे. तसेच 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 50% टक्के सवलत आहे.
$ads={2}
हे ही वाचा - कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन, दिवाळी बोनस -कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार 15,144 रुपयांची वाढ - तब्बल 3049 जागांसाठी मेगा भरती - ऑनलाईन अर्ज
विविध प्रकारच्या बस सेवा सवलत मूल्याच्या प्रति पूर्तिपोटी एसटी महामंडळाच्या उपाध्यक्षांनी राज्य सरकारकडे 334 कोटी 52 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार सरकारने सदरचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.