MIDC Recruitment Notification 2023 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) आस्थापनेवरील गट अ, ब आणि क संवर्गातील एकूण 802 पदांसाठी जाहिरात (Notification) प्रसिद्ध करण्यात आले आहे. खूप वर्षांनतर ही सरळसेवा पदभरती होणार आहे. त्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांनी या संधीचा जरूर लाभ घ्यावा.
$ads={1}
MIDC मध्ये 802 जागांसाठी जम्बो भरती!
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) मध्ये विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, इयत्ता दहावी ते पदवी आणि संबंधित आवश्यक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. या भरती मध्ये तब्बल विविध 34 पदांची भरती होत असून, पदांचा तपशील वेतनश्रेणी व रिक्त जागा खालीलप्रमाणे आहेत.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती एकूण पदे, वेतनश्रेणी व जागा
पदाचे नाव - वेतनश्रेणी - एकूण जागा
- कार्यकारी अभियंता (स्थापत्य) - S-23 : 67700-208700 - एकूण जागा - 3
- उप अभियंता (स्थापत्य) - S-20 : 56100-177500 एकूण जागा - 13
- उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी) - S-20 : 56100-177500 - एकूण जागा - 3
- सहयोगी रचनाकार - S-23 : 67700-208700 - एकूण जागा - 2
- उप रचनाकार - S-20 : 56100-177500 - एकूण जागा - 2
- उप मुख्य लेखा अधिकारी - S-20 : 56100-177500 - एकूण जागा - 2
- सहाय्यक अभियंता (स्थापत्य) - S-15 : 41800-132300 - एकूण जागा - 107
- सहाय्यक अभियंता (विद्युत / यांत्रिकी) - S-15 : 41800-132300 - एकूण जागा - 21
- सहाय्यक रचनाकार - S-15 : 41800-132300 - एकूण जागा - 7
- सहाय्यक वास्तूशास्त्रज्ञ - S-15 : 41800-132300 - एकूण जागा - 2
- लेखा अधिकारी - S-15 : 41800-132200 - एकूण जागा - 3
- क्षेत्र व्यवस्थापक - S-15 : 41800-132300 - एकूण जागा - 8
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - S-14 : 38600-122800 - एकूण जागा - 17
- कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी) - S-14 : 38600-122800 - एकूण जागा - 2
- लघुलेखक (उच्चश्रेणी) - S-15 : 41800-132300 - एकूण जागा - 14
- लघुलेखक (निम्न श्रेणी) - S-14 : 38600-122800 - एकूण जागा - 20
- लघुटंकलेखक - S-6 : 19900-63200 - एकूण जागा - 7
- सहाय्यक - S-13 : 35400-112400 - एकूण जागा - 3
- लिपिक टंकलेखक - S-6 : 19900-63200 - एकूण जागा - 66
- वरिष्ठ लेखापाल - S-14 : 38600-122800 - एकूण जागा - 6
- तांत्रिक सहाय्यक (श्रेणी - 2) - S-8 : 25500-81100 - एकूण जागा - 32
- वीजतंत्री (श्रेणी-2) -S-8 : 25500-81100 - एकूण जागा - 18
- पंपचालक (श्रेणी-2) - S-6 : 19900-63200 - एकूण जागा - 103
- जोडारी (श्रेणी-2) - S-6 : 19900-63200 - एकूण जागा - 34
- सहाय्यक आरेखक - S-8 : 25500-81100 - एकूण जागा - 9
- अनुरेखक - S-7 : 21700-69100 - एकूण जागा - 49
- गाळणी निरिक्षक - S-10 : 29200-92300 - एकूण जागा - 2
- भूमापक - S-8 : 25500-81100 - एकूण जागा - 26
- विभागीय अग्निशमन अधिकारी - S-20 : 56100-177500 - एकूण जागा - 1
- सहायक अग्निशमन अधिकारी - S-14 : 38600-122800 - एकूण जागा - 8
- कनिष्ठ संचार अधिकारी - S-13 : 35400-112400 - एकूण जागा - 2
- वीजतंत्री - श्रेणी 2 (ऑटोमोबाइल) - S-8 : 25500-81100 - एकूण जागा - 1
- चालक यंत्र चालक - S-7 : 21700-69100 - एकूण जागा - 22
- अग्निशमन विमोचन - S-6 : 19900-63200 - एकूण जागा - 187
हे ही वाचा - कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा - प्रशासकीय सहायक CAG 1773 जागांसाठी अर्ज येथे करा - पनवेल महानगरपालिकेत मोठी भरती सुरु - दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरी
$ads={2}
महत्वाच्या तारखा MIDC Recruitment Online Application 2023 : या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज हे दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी पासून सुरुवात होणार असून, दिनांक 25 सप्टेंबर 2023 पर्यंत फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे किंवा भरतीची तयारी करण्यासाठी अधिकचा वेळ मिळाला आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती जाहिरात येथे डाउनलोड करा
सरळसेवेने भरावयाच्या पदाकरीता महामंडळाच्या www.midcindia.org या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांनी www.midcindia.org या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात वाचून त्याप्रमाणे विहित मुदतीत ऑनलाईन (Online) पध्दतीनेच www.midcindia.org या संकेतस्थळावर आपले अर्ज सादर करावेत. ऑनलाईन पध्दतीने भरलेल्या अर्जाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. सदर संकेतस्थळास भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरतीप्रक्रिये संबंधित आवश्यक ती अद्ययावत माहिती प्राप्त करुन घेण्याची जबाबदारी उमेदवारांची राहणार आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती जाहिरात येथे डाउनलोड करा