Meri Mati Mera Desh Abhiyan : मेरी माटी मेरा देश अभियान प्रमाणपत्र असे डाउनलोड करा; प्रत्येक भारतीयाला प्रेरित करणारा उपक्रम

Meri Mati Mera Desh Abhiyan Certificate Download : मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत नागरिकांना सहभागी होता येणार आहे, त्यासाठी माती किंवा मातीचा दिवा हातात धरून सेल्फी काढून किंवा वृक्षारोपण करताना किंवा तिरंगा ध्वज हातात घेऊन शपथ घेतानाचा फोटो काढून मेरी माटी मेरा देश अभियान प्रमाणपत्र कसे डाउनलोड करायचे ते सविस्तर पाहूया..

$ads={1}

मेरी माटी मेरा देश अभियानात सर्वाना सहभागी होण्याची संधी

Meri Mati Mera Desh Abhiyan Certificate Download

भारत देश आज जगात सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. देशाने अनेक क्षेत्रांत प्रगती केली आहे. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ज्ञात-अज्ञात देशवासियांनी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या त्यागामुळेच स्वातंत्र्याची पहाट उगवली. 

आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होत असतानाच त्यांच्या या त्यागाचे स्मरण करणे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या मेरी माटी, मेरा देश (Meri Mati Mera Desh Abhiyan) या अभियानाच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, सर्वस्व गमावलेल्या, बलिदान दिलेल्या त्या सर्व ज्ञात, अज्ञात देशवीरांप्रती नतमस्तक होण्याची, अभिवादन करण्याची संधी आपल्या प्रत्येकाला मिळाली आहे.

मेरी माटी मेरा देश अभियान प्रत्येक भारतीयाला प्रेरित करणारा उपक्रम

स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देता त्यापासून प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्यासाठी प्रत्येक भारतीयाला प्रेरित करणारा हा उपक्रम आहे. या अभियानाचा शुभारंभ दि. 9 ऑगस्ट म्हणजे क्रांतीदिनी करण्यात आला आहे. संपूर्ण देशात, संपूर्ण राज्यात एकाच कालावधीत हे अभियान राबविले जात आहे.

हे ही वाचा - राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी पहा -सर्व कर्मचाऱ्यांची माहिती एकाच ठिकाणी - लेटेस्ट जुनी पेन्शन योजना बातमी 

शहीद वीरांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ‘मेरी माटी मेरा देश अभियान’

मेरा माटी मेरा देश अभियान काय आहे?

मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत शिलाफलक, वसुधा चंदन, स्वातंत्र्यसैनिक, वीरांना वंदन, पंच प्रण (शपथ घेणे), ध्वजारोहण व राष्ट्रगान अशा पाच उपक्रमांतून  क्रांतिकारक व आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण होण्यास मदत होणार आहे. [अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री यांनी दिली पंचप्रण प्रतिज्ञा]

ज्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी  प्राणांची आहुती दिली, त्यांचे स्मरण करण्याचा हा उपक्रम आहे. ज्यांनी मिळालेले स्वातंत्र्य अखंड, अबाधित ठेवण्यासाठी प्राण खर्चिले, त्यांना सलाम, वंदन, प्रणाम करण्याचा, त्यांच्याप्रती नतमस्तक होण्याचा हा उपक्रम आहे. त्याचबरोबर भावी पिढीमध्ये देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी या माध्यमातून देशभक्तीचा जागर करण्यात येणार आहे.

मेरी माटी मेरा देश अभियानातील पाच उपक्रम

  1. शिलाफलक
  2. वसुधा वंदन
  3. स्वातंत्र्य सैनिक, वीरांना वंदन
  4. पंचप्रण (शपथ घेणे)
  5. ध्वजारोहण

मेरी माटी मेरा देश अभियान प्रमाणपत्र डाउनलोड करा - Meri Mati Mera Desh Abhiyan Certificate Download

या अभियानात जनसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी https://merimaatimeradesh.gov.in हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले असून, नागरिक माती किंवा मातीचा दिवा हाती धरून काढलेला सेल्फी या संकेतस्थळावर अपलोड करता येणार आहे. या कृतीतून भारताला विकसित देश बनविणे, गुलामगिरीची मानसिकता दूर करणे, आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगणे, एकता व बंधुता टिकवून ठेवणे, आदर्श नागरिकाची कर्तव्ये पार पाडणे आणि देशाचे रक्षण करणाऱ्याप्रती आदर व्यक्त करणे असे अनेक हेतू आहेत.

मेरी माटी मेरा देश अभियानात सहभागी होण्यासाठी माती किंवा मातीचा दिवा हातात धरून सेल्फी काढा किंवा वृक्षारोपण करताना किंवा तिरंगा ध्वज हातात घेऊन शपथ घेतानाचा फोटो काढा.

आता https://merimaatimeradesh.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जा (डायरेक्ट लिंक पुढे दिली आहे)

$ads={2}

आता तुमचे शुभ नाव टाका (Enter your name) > तुमचा मोबाईल नंबर टाका (Enter your Mobile) > राज्य निवडा (State) > जिल्हा निवडा (District) > प्रतिज्ञा घ्या (We Pledge to) > सबमिट (Submit) बटनावर क्लिक करा> आता Choose file वर क्लिक करा > तुम्ही काढलेला फोटो सिलेक्ट करा (फोटो 10 MB पर्यंतचा हवा) > आता पुन्हा Submit बटनावर क्लिक करा > फोटो अपलोड होताच तुम्हाला Meri Mati Mera Desh Campaign चे प्रमाणपत्र दिसेल ते डाउनलोड करा.

मेरी माटी मेरा देश अभियान प्रमाणपत्र डाउनलोड करा

सरकारी अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now