Government Employees News : शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या मंजूरीबाबत प्रतिपुर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकारांत सुधारणा करण्याबाबत, एक महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
$ads={1}
शासकीय अधिकारी व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम, १९६१ व त्यानुषंगाने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय यामधील तरतुदींच्या अधीन राहून वैद्यकीय खर्च प्रतिपुर्ती मंजूर करण्यात येते.
वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीसाठी मंजूरीच्या अधिकारांमध्ये सुधारणा!
वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीच्या प्रस्तावांची प्रलंबित प्रकरणे लक्षात घेता, सार्वजनिक आरोग्य विभागाने दि. १७.०१.२०२३ च्या शासन निर्णयान्वये, महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम, १९६१ व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णयामधील अटी व शर्तीच्या अधीन राहून ६ जून २०१९ च्या शासन निर्णयानुसार विभागप्रमुख व प्रादेशिक विभागप्रमुख यांच्या वित्तीय अधिकारांमध्ये बदल केले आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि. १७.०१.२०२३ रोजीच्या शासन निर्णयामधील परिच्छेद ४ मध्ये नमूद केल्यानुसार, सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत क्षेत्रिय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी यांच्या निव्वळ वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीच्या मंजूरीकरीता विभागप्रमुख व प्रादेशिक विभागप्रमुख घोषित करण्यास व त्यांच्यासमोर विहित केलेल्या वित्तीय मर्यादेत प्रतिपुर्तीचे अधिकार प्रदान करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
दिनांक २२ ऑगस्ट २०२३ रोजी शासन निर्णयानुसार शासनाने असे निर्देश दिले आहे की, वर नमूद केल्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिनस्त सर्व क्षेत्रिय कार्यालयांमधील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीस मंजूरी देताना महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम, १९६१ व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय/परिपत्रके /आदेश यामधील तरतुदी काटेकोरपणे तपासून मंजूरी देण्याची जबाबदारी संबंधित प्राधिकाऱ्यांची राहील. तसेच नियमात न बसणाऱ्या बाबी शासनास सादर करण्यात याव्यात. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि. १७.०१.२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदींचे तंतोतंत पालन करण्यात यावे. असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
$ads={2}
हे ही वाचा - कंत्राटी कर्मचारी कायम संदर्भात महत्वाची बैठक संपन्न पहा - तलाठी भरती महत्वाची अपडेट