Employees Salary Latest News : सरकारी कर्मचारी व निवृत्तीवेतन धारकांच्या दरमहा वेतन (Salary) आणि निवृत्ती वेतन (Pension) बऱ्याचदा उशिरा होते, दरमहा वेतन वेळेत होण्यासाठी शासनाने मागील महिन्यात एक महत्वाचे परिपत्रक काढले होते, त्यानुषंगाने आता ऑगस्ट महिन्याचा पगार व पेन्शन वेळेत होऊ शकणार आहे, नुकतेच दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी प्राथमिक शिक्षण संचालनालय कडून सर्व जिल्ह्यांना वेतन अनुदान व निवृत्ती वेतन अनुदान संदर्भात महत्वाचे परिपत्रक जारी केले आहे.
$ads={1}
सरकारी कर्मचारी व निवृत्तीवेतन धारकांचे वेतन वेळेत होणार?
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे दरमहा वेतन आणि निवृत्तीवेतन (पेन्शन) (Government Employees Salary & Pension) जमा होण्यास बऱ्याचदा वेळ होतो. जिल्हा परिषदांकडुन दरमहा मागविण्यात येणारी नियमित वेतन व निवृत्ती वेतनाबाबतची माहिती (अनुदान मागणीपत्र) शासनास दर महिन्याला करावी लागते, मात्र ही माहिती शासनास उशिराने प्राप्त होत असल्याने पगार उशिरा होतो.
त्यामुळे जिल्हा परिषद अधिकारी/कर्मचारी यांचे नियमित वेतन व सेवानिवृत्ती वेतन वेळेत त्यांच्या खात्यावर जमा होत नसल्याच्या तक्रारी दुरध्वनी द्वारे/ निवेदनाद्वारे शासनाकडे येत असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. यासाठी आता यासाठी शासनाने दरमहा वेतन आणि निवृत्तीवेतन वेळेत अदा करण्यासाठी यापूर्वीच 12 जुलै रोजी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक काढले आहे.
त्यानुसार जिल्हा परिषदांकडुन दरमहा मागविण्यात येणारी नियमित वेतन व निवृत्ती वेतनाबाबतची माहिती (अनुदान मागणीपत्र) शासनास दर महिन्याला 20 तारखेपर्यंत उपलब्ध करुन देण्यात यावी, असे निर्देश शासन स्तरावरून जिल्हा परिषदांना देण्यात आले होते. त्यानुसार आता ऑगस्ट महिन्याचे वेतन व निवृत्तीवेतन मंजूर करण्यात आले आहे.
ऑगस्ट महिन्याचे पगार आणि पेन्शन वेळेत मिळणार!
महाराष्ट्र विनियोजन (लेखानुदान) अधिनियम 2023 अंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वेतन आणि निवृत्तीवेतन व आस्थापना अनुदाने मंजूर करण्यात आले आहे. जिल्हानिहाय निधीचे परिपत्रक लिंक खाली दिलेली आहे.
माहे ऑगस्ट 2023 महिन्याचे वेतन व भत्ते, निवृत्तीवेतन याबाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून मान्यता दिली आहे. त्यामुळे आता ऑगस्ट महिन्याचा पगार वेळेत होऊ शकणार आहे.
$ads={2}
जिल्हानिहाय मंजूर निधी परिपत्रक येथे पहा
हे ही वाचा -फॅमिली पेंशन ग्रॅच्युटी निर्णय काय आहे? - तलाठी भरती परीक्षा निकाल 2023 - कट ऑफ येथे पहा