Employees News: राज्यातील मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन (Salary) मिळावे, या मागणीसाठी राज्यातील विविध विभागातील कर्मचारी शासनाकडे मागणी करत आहेत, आता अशासकीय बालगृह, बालकाश्रमातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली, यामध्ये या कर्मचाऱ्यांना निश्चित मानधन देण्याबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला, सविस्तर वाचा..
$ads={1}
राज्यातील 'या' कर्मचाऱ्यांना निश्चित मानधन मिळणार
अशासकीय बालगृह, बालकाश्रम येथे काम करणाऱ्या अधीक्षक व समुपदेशकांना अन्य शासकीय बालगृहाप्रमाणे निश्चित मानधन देण्याबाबत सरकारने सन 2022 च्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेत मानधन वाढीचे आश्वासन दिले होते.
यासंदर्भात दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीमध्ये राज्यातील अशासकीय बालगृह, बालकाश्रमात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय बालगृहातील कर्मचाऱ्यांप्रमाणे मानधन देण्याबाबत लवकरच एक समिती नेमण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील रोजंदारी कर्मचारी शासन सेवेत कायम शासन निर्णय पहा
शासनाच्या बालगृहाप्रमाणे राज्यात असलेली अशासकीय बालगृह, बालकाश्रमात काम करणाऱ्या अधीक्षक व समुपदेशकांना इतर सरकारी बालगृहाप्रमाणे निश्चित मानधनाबाबत तसेच बांधकामाचे क्षेत्रफळ तीनपट वाढीव मिळावे या आश्वासनाच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी एक समिती नेमण्यात येईल, असे मंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.
यावेळी आमदार राजेश राठोड, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, महिला व बाल विकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, उपायुक्त राहुल मोरे उपस्थित होते.
हे ही वाचा - कंत्राटी कर्मचारी लेटेस्ट न्यूज वाचा - सरकारी कर्मचारी बातम्या - नोकरीच्या विविध संधी पहा
हे ही वाचा - OLD पेन्शन योजना अपडेट पहा - तलाठी भरती परीक्षेचा निकाल कट ऑफ पहा