Employees Master Database : राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार; नियोजन विभागाचे शासन परिपत्रक जारी..

राज्यातील नियमित आस्थापनेवरील कर्मचारी व नियमितेतर आस्थापनेवरील कर्मचारी (कार्यव्ययी आस्थापनेवरील रोजंदारीवरील, अंशकालीन, मानसेवी इ) तसेच तदर्थ तत्त्वावर नेमणुका करण्यात आलेले कर्मचारी अशा सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांची सर्वकष माहितीकोष (Employees Master Database) माहिती गोळा करण्यात येणार आहे. याबाबतचे शासन परिपत्रक नियोजन विभागाने जारी  केले आहे.

$ads={1}

अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई या कार्यालयाकडून महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष (Employees Master Database) दरवर्षी अद्ययावत करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.

Employees Master Database

शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्व भरलेल्या व रिक्त पदांच्या माहितीचा समावेश असलेला शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष (Employees Master Database EMDb) अद्ययावत करण्यात येणार आहे. 

दिनांक 1 जुलै 2023 या संदर्भ दिनांकास कर्मचाऱ्यांचा सेवार्थ I.D. (Employee's Service I.D.), भविष्य निर्वाह निधी PF / DCPS खाते क्रमांक, पॅन क्रमांक, आधार क्रमांक, कर्मचाऱ्याचे संपूर्ण नाव, जन्मदिनांक, लिंग, सेवेत रुजू झाल्याचा दिनांक, निवृत्तीचा दिनांक, सेवेत रुजू झाल्यानंतरचे पदनाम, कर्मचाऱ्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक, कर्मचाऱ्याचा Email ID., सामाजिक प्रवर्ग, कर्मचाऱ्याची जात, धर्म, स्वग्राम, दिव्यांग व्यक्ती, इत्यादी स्थायी स्वरूपाची माहिती तसेच (लागू असल्यास) सध्याचे पदनाम, सध्याच्या पदावरील पदोन्नतीचा दिनांक, आश्वासित प्रगती योजना, इत्यादी माहिती गोळा करण्यात येणार आहे. 

हे ही वाचा - लेटेस्ट जुनी पेन्शन योजना बातमी - कंत्राटी कर्मचारी ताज्या बातम्या - सरकारी कर्मचारी बातम्या

माहिती नोंदणीकरिता अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून संगणकीय ऑनलाईन आज्ञावली तसेच लॉग इन आयडी व पासवर्ड आणि माहिती भरण्याचे व आज्ञावली वापरण्यासंबंधीचे सूचना संच संबंधित कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

$ads={2}

शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष 2023 (Employees Master Database EMDb 2023) विहित वेळेत अद्ययावत करण्यासाठी व त्याची कार्यवाही योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी राज्य शासनाचे आहरण व संवितरण अधिकारी यांना खालील वेळापत्रक व सूचना विचारात घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

Employees Master Database Time table

नियोजन विभागाचे शासन परिपत्रक पहा

 

सरकारी अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now