Divyang News : दिव्यांग बांधवांना लवकरच सर्वसमावेशक धोरण मिळणार!

Divyang News : शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्याचा घेतलेला निर्णय हा दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाचा आहे. दिव्यांग (Divyang) बांधवांच्या कल्याणासाठी लवकरच सर्वसमावेशक धोरण (Inclusive Policy) आणले जाईल. दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग आणि नवे धोरण यामुळे दिव्यांग बांधवांच्या जीवनातील दु:ख आणि वेदना दूर करण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास या अभियानाचे अध्यक्ष आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

$ads={1}

Divyang News

दिव्यांगांसाठी 5 टक्के खर्च करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे सांगून ते म्हणाले, दिव्यांग बांधवांसाठी आतापर्यंत 82 शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे दिव्यांगाना अधिक तत्परतेने लाभ मिळण्यास मदत होत आहे. स्वतःचे दुःख विसरून दिव्यांग व्यक्ती आत्मविश्वासाने जीवन जगत असतो. या दिव्यांग व्यक्तीला सर्वांनीच आधार देऊन त्याचा सन्मान केला पाहिजे, असेही आमदार श्री. कडू  म्हणाले.

दिव्यांगांचे सर्वेक्षण अधिक चांगल्या प्रकारे होईल यासाठी अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने दक्षता घ्यावी. दिव्यांग बांधवांच्या अनेक समस्या आहेत. या समस्या दूर करून दिव्यांग बांधवांच्या जीवनात आनंद व चैतन्य निर्माण करण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. दिव्यांगांना युडीआयडी ओळखपत्र व आधार ओळखपत्र मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. घरकुल योजनेमध्ये दिव्यांग लाभार्थींना प्राधान्य देऊन त्यांना त्यांचे हक्काचे घर मिळवून द्यावे, असे त्यांनी सूचित केले.

ऐतिहासिक निर्णय ! राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन- आता स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाच्या माध्यमातून दिव्यांगांच्या समस्या दूर होण्यास मदत होईल, असे  मत आमदार अरुण लाड यांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, जिल्ह्यात सुमारे 40 हजार दिव्यांग बांधवांची  नोंदणी झाली आहे. दिव्यांगांना सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण करून दिव्यांग बांधवांची नोंदणी केली जाणार आहे. नोंदणीनंतर अशा दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल.  याबरोबरच जिल्ह्यात दिव्यांगाच्या तपासणीसाठी कॅम्प आयोजित करून दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, असे ते म्हणाले.

स्वागत व प्रास्ताविक उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले. दीप प्रज्वलनानंतर मिरज येथील अंध शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना प्रातिनिधीक स्वरुपात शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग बांधवांशी जागेवर जावून संवाद साधला व त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

$ads={2}

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now