Dahi Handi 2023 : गोविंदांना राज्य सरकारकडून मोठं गिफ्ट.. विम्यासाठी १८ लाख ७५ हजारांचा निधी मंजूर

Dahi Handi Insurance Cover 2023 : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची घोषणा मा. मुख्यमंत्री यांनी केली होती. यंदा सरकारने दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून विमा संरक्षणासाठी १८ लाख ७५ हजारांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

$ads={1}

गोविंदांना राज्य सरकारकडून मोठं गिफ्ट!

Dahi Handi Insurance Cover 2023

दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोविंदाचा विमा उतरवणे (Insurance Cover) व प्रो- गोविंदा लीग स्पर्धेचे आयोजन करणेबाबत मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २५ जुलै २०२३ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार दहीहंडी उत्सवामध्ये तसेच प्रो- गोविंदा लीग स्पर्धेत सहभागी होणाऱ्या एकूण ५०,००० गोविंदाना विमा संरक्षण (Insurance Cover) उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता, आता यामध्ये अजून २५ हजार असे एकूण ७५०००० गोविंदाना विमा सरंक्षण देण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

दहिहंडी उत्सव (Dahihandi Festival) , प्रो-गोविंदा लीग (Pro-Govinda League) मधील सहभागी गोविंदांना मानवी मनोरे रचताना अपघात, दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यातूनच काही गोविंदांना अपघात होऊन, गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू घडून येण्याची किंवा त्यांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता निर्माण होते. यासाठी आता शासनाने गोविंदाना विमा संरक्षण (Insurance Cover) उपलब्ध करुन दिले आहे. 

दिनांक १८ ऑगस्ट, २०२३ च्या GR नुसार विमा संरक्षण उपलब्ध करुन दिलेल्या ५०,००० गोविदाव्यतिरिक्त अधिकच्या २५,००० गोविंदाना विमा संरक्षण उपलब्ध करुन देण्याकरीता ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीला (Oriental Insurance Company) प्रति गोविंदा रु. ७५/- विमा हप्ता याप्रमाणे एकूण रु.१८,७५,०००/- (अक्षरी रुपये अठरा लक्ष, पंच्याहत्तर हजार फक्त) इतका निधी अदा करण्यासाठी दहिहंडी समन्वय समिती (महा) या संस्थेस वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातील ७५००० गोविंदाना विमा सरंक्षण मिळाले आहे.

आरोग्य विभाग मेगा भरती जाहिरात (ऑनलाईन अर्ज) डायरेक्ट लिंक येथे क्लिक करा

$ads={2}

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now