Child Care Leave Government Employees: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून, महिला कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे मुलांच्या बालसंगोपनासाठी प्रसूती रजा दिली जाते, त्याप्रमाणे आता पुरुष कर्मचाऱ्यांना देखील मुलांच्या बालसंगोपनासाठी 730 दिवसांची रजा दिली जाणार असल्याची माहिती सरकारने लोकसभेत दिली.
$ads={1}
सरकारी महिला आणि एकल पुरुष कर्मचाऱ्यांना मुलांच्या संगोपनासाठी रजा घेण्याचा अधिकार आहे. केंद्रीय नागरी सेवा Central Civil Services (Leave) नियम, 1972 च्या नियम 43-C अंतर्गत, केंद्रीय नागरी सेवा आणि पदांवर नियुक्त असलेले महिला आणि एकल पुरुष कर्मचारी बाल संगोपन रजा Child Care Leave (CCL) साठी पात्र आहेत. असे केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सांगितले. (मुलांच्या संगोपनासाठी वार्षिक 27000 रूपये - बालसंगोपन सुधारित योजना पहा)
केंद्रीय कार्मिक मा. राज्यमंत्री म्हणाले की, मुलांचे वय 18 वर्षांपर्यंतच्या 2 मुलांच्या देखभालीसाठी, संपूर्ण शासकीय सेवेदरम्यान जास्तीत जास्त 730 दिवसांपर्यंत रजा मंजूर करण्याची तरतूद आहे. तसेच मुल जर दिव्यांग असेल तर त्यासाठी कोणतीही वयोमर्यादा निश्चित केलेली नाही. असे लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले.
हे ही वाचा - सर्व कर्मचाऱ्यांची माहिती एकाच ठिकाणी - लेटेस्ट जुनी पेन्शन योजना बातमी - कंत्राटी कर्मचारी ताज्या बातम्या -अस्थायी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी धोरणात्मक निर्णय
$ads={2}
अधिवेशनामध्ये, सरकारी केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढविणार आहे का? असा प्रश्न लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सरकारला विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मा. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव सरकार समोर नाही. (राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय वाढणार? पहा )