Best Strike : बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला आहे. गेल्या 8 दिवसांपासून हा संप सुरू होता. सोमवारी मध्यरात्रीनंतर कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मा. मुख्यमंत्री यांची भेट घेतल्याचे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधीने आझाद मैदानावर माध्यमांशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन दिल्याचे प्रतिनिधीने सांगितले. या बैठीकत त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर, संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली.
पोस्ट ऑफिस भरती 30,041 रिक्त पदांसाठी - ऑनलाईन अर्ज
सर्व 34 जिल्हा परिषद जाहिराती एकाच ठिकाणी - जिल्हानिहाय जागा व जाहिराती डाउनलोड डायरेक्ट लिंक..
बेस्ट कंत्राटी कामगारांच्या 'या' मागण्या मान्य
बेस्ट मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य झाल्यामुळे संप मागे घेण्यात आला, सर्व आगारातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात याबाबत घोषणा केली आहे.
- कर्मचाऱ्यांचे (Basic Salary) पगार 18,000 करण्यात येणार
- कर्मचाऱ्यांच्या वार्षिक रजा भरपगारी करण्यात येणार
- मोफत प्रवास
- कर्मचाऱ्यांना वार्षिक दिवाळी बोनस देण्यात यावा
- कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टी पगारी
- कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ देण्यात यावी यावर कंपन्याना सूचना देणार
- संप काळातील पगार देणार
खासगी बस ऑपरेटर्सच्या कर्मचाऱ्यांच्या गटाचे समन्वयक विकास खरमाळे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी पगारवाढ, बोनस, सुट्या आणि मोफत बस प्रवास या आमच्या प्राथमिक मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे हा संप मागे घेण्यात आला आहे. [रविवार व सुटीच्या दिवशी काम केल्यास ओव्हरटाइम भत्ता ]
हे ही वाचा - कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन, दिवाळी बोनस -कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार 15,144 रुपयांची वाढ - तब्बल 3049 जागांसाठी मेगा भरती - ऑनलाईन अर्जराज्यातील 10 वर्ष पूर्ण झालेले कंत्राटी कर्मचारी कायम
पोस्ट ऑफिस भरती 30,041 रिक्त पदांसाठी - ऑनलाईन अर्ज
सर्व 34 जिल्हा परिषद जाहिराती एकाच ठिकाणी - जिल्हानिहाय जागा व जाहिराती डाउनलोड डायरेक्ट लिंक..